https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मंदीरातील दररोज निर्माल्य संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था करा* *मानवतच्या महिलांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मानवत / प्रतिनिधी
शहरातील सर्व मंदिरांसह घराघरात निर्माण होणारे निर्माल्य संकलित करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने नवीन घंटागाडी सुरू करावी अशी मागणी शहरातील आर्य वैश्य महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवारी ता १७ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
निवेदनात म्हटले आहे की , शहरातील अनेक भागात मंदिरे व प्रार्थनास्थळे मोठया प्रमाणात असून या धार्मिक ठिकानासाह घरोघरी दररोज निर्माल्य तयार होते पण ते कचऱ्याच्या गाडीत टाकले जात नाही . परिणामी पाण्याचे स्तोत्र दूषित होऊन प्रदूषण होत आहे . त्यामुळे सदरील निर्माल्य संकलित करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने वेगळी नवीन घंटागाडी सुरू करावी .
निवेदनावर आर्य वैश्य महिला सेवाभावी संस्थाध्यक्ष सविता कत्रुवार , सिध्दलक्ष्मी गुंडाळे , माधुरी कत्रुवार , ममता चिद्रवार , शितल पदमवार , दिपाली मोदी , ज्योती गुंडाळे , मीना घोडके , मंगल भायेकर , पूजा डेंग , सारिका भायेकर , सविता महात्मे , शकुंतला बारकर , कचराबाई रापेल्लीवार , विजया रापेल्लीवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704