वझुर बु. जिल्हा परिषद शाळेची निसर्ग सहल उत्सहात साजरी.
विद्यार्थ्यांनी लूटला निसर्ग सहलीचा मनमूराद पणे आनंद

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौजे वझुर बु. येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने निसर्ग सहली चे आयोजन दि.२० जानेवारी रोजी करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांची सहल मानवतचे गटशिक्षणाधिकारी
डी. आर. रणमाळे यांच्या प्रेरणेने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर चव्हाण, उपाध्यक्ष मारोती तुपसमुंद्रे, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ज्ञानोबा चव्हाण व इंद्रजीत (बाळू) चव्हाण यांच्या शेत शिवारात संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांची झाडे वेली , विविध पीके, प्राणी, पक्षी, पुल, नदी, खळ खळून वाहणारे पाणी, खडक आदी निसर्ग किमयाची विद्यार्थ्यांनी कुतूहलतेने निरीक्षण केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विविध गुण कला, कौशल्याचे दर्शन घडवत मनोरंजनात्मक मराठी, हिंदी, गाणी, भावगीते, भक्तिगीते, बालगीते, कविता , गोष्टी , बडबडगीते जोक्स , नृत्य इत्यादीचे या वेळी सादरीकरण केले. या वेळी मारोती तुपसमुंद्रे व ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यां ना खाऊचे वाटप करण्यात आले. इंद्रजीत (बाळू) चव्हाण यांनी उपस्थितीत शिक्षक व सहलीतील सहभागी पालक यांच्या साठी पुरण पोळीची गोड मेजवानी देण्यात आली. त्या नंतर सहलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी निसर्ग सहलीत शाळेचे कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक श्री. गजानन गोसावी , श्री, झेलाजी काळे, शेख अल्ताफ , श्री. विजय वाघ यांच्या सह विद्यार्थी व पालक यांची या वेळी उपस्थिती होती.
***