https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
कृषी व व्यापार

मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

महाराष्ट्रात मागील दोन ते तीन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळी(फॉलआर्मीवर्म) शास्त्रीय नाव –स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डाहि कीडमका पिकावर सतत मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करतांना आढळते आहे.भारतात जुन – जुलै, २०१८ मध्ये सर्व प्रथम तमिळनाडू व दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये या किडीची नोंद झाली. तदनंतर झपाट्याने या किडीचा प्रसार शेजारील आंध्र प्रदेश व तेलंगना या राज्यांत झालेला दिसून आला. महाराष्ट्रात तांदुळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे प्रथमत: या किडीचा प्रादुर्भाव झाला होता.

    कृषि विभागाच्या सांख्यिकीय आकडेवारी नुसार राज्यात खरीप मका (२०२२-२३) पिकाखाली ८.८९ लाख हेक्टर क्षेत्र असूनत्यापैकी ८.७५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. जवळपास सर्वच मका उत्पादक जिल्ह्यांत या किडीचा प्रादुर्भाव होतांना दिसून येतो आहे. सदर कीड बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होतात.ही कीड मका, मधुमका, ज्वारी, बाजरी, भात ही तृणधान्य पिके तसेच कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करते त्यामुळे वेळीच तिचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

ओळख व जीवनक्रम – पतंग –नर पतंगाचे पुढील पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. तर मादी पतंगाचे पुढील पंख पूर्णपणे करड्या रंगाचे असतात. नरव मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असून कडा करड्या रंगाच्या असतात. पतंग निशाचर असून ७ ते १२ दिवस जगतात. उष्ण व दमट वातावरणात ते खुपच सक्रीय असतात.

अंडी– मादी पतंग पानांच्या वरच्या किंवा खालील बाजूस, पोग्यांमध्ये पिवळसरसोनेरी घुमटाकार १०० ते २०० अंडी पुजाक्यांमध्ये घालते. त्यावर लोकरीसारखे मऊ संरक्षक आवरण असते. अंडी अवस्था २ ते ३ दिवसांची असते.

अळी-अळी अवस्था पिकाला प्रत्यक्ष नुकसान करणारी असल्यामुळे ती ओळखतांना पुढील खुणालक्षात ठेवाव्यात. पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ से.मी. लांब असते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळ्या रंगाच्या तिन रेषा असतात. डोक्यावर उलट्या इंग्रजी ‘Y’अक्षरा सारखी खुण असते तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. शरीरावरील आठव्या खंडावर चौकोनी आकारात फुगीर गोल अंडी अथवा फिकट रंगाचे चार ठिपके दिसुन येतात. अळीच्या शरीरावर इतरत्र कुठेही अशी ठेवण दिसत नाही. या दोन बाबींवरूनच प्रामुख्याने या प्रजातीची ओळख करता येणे सोपे होते. सामान्य लष्करी अळीचे शरीर तपकिरी असले तरी बहुतांश अळीची पाठ हिरवट असते व अशा अळीच्या पाठीवर फुगीर ठिपके गडद रंगा एैवजी हलक्या रंगाचे असतात. अळी अवस्था सहा टप्यांमध्ये पूर्ण होते. अळी अवस्था उन्हाळ्यात १४ दिवसांची तर हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात ती ३० दिवसांपर्यंत असू शकते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704