कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड:
कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमरी येथे दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ICICI, HDFC, AXIS, YES BANK, INDUSAND BANK, KOTAK BANK, RBL.. BANDHAN BANK, DCB या बँकांमध्ये Senior Officer (RM) या पदाकरीता विविध बँकांमध्ये ३०० पेक्षा अधिक जागांकरीता कॅम्पस मुलाखती घेण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तसेच स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्र (Placement Cell) यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्याकरीता निबंध लेखन, बुद्धीमत्ता चाचणी तसेच मौखिक मुलाखत यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या जागांकरीता विद्यार्थ्यांचे वय हे १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या जागांकरीता १० वी, १२ वी तसेच पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. सध्या पदवीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील या जागांकरीता मुलाखती देऊ शकतात.
दि. २५ जानेवारी २०२३ रोजी मुलाखतीसाठी येताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये सकाळी १० वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच सोबत येतांना आपला बायोडाटा, आधारकार्ड यांच्या दोन झेरॉक्स प्रती, दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय मुलाखतीस येताना आपले मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहिती करीता कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयातील रोजगार मेळाव्याचे आयोजक डॉ. टी. व्ही. पोवळे (९४०३११७०८४), डॉ. व्ही. बी. गणिपूरकर (९९७०६२१८५३), डॉ. एस. आर. वडजे (९३५९०९६०७०) यांच्याशी संपर्क साधावा.