https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आ. बाबाजाणी दूर्राणी यांच्या हस्ते अब्दुल हबिब भडके यांची राष्ट्रवादी काॅग्रेसच्या मानवत शहराध्यक्षपदी निवड

मानवत / प्रतिनिधी.

अब्दुल हबीब अब्दुल कादर बागवान ( भडके ) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार (गट) मानवत शहराध्यक्ष पदी परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते देण्यात आलेल्या एका निवड पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामूळे मानवत शहरातील यूवकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मानवतच्या शहराध्यक्षपदी समाजसेवक, निष्ठावान माजी नगर सेवक अब्दुल हबीब अब्दुल कादर बागवान (भडके ) यांची मानवत शहर राष्ट्रवादी काॅग्रेसच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांचे विचार तळा गाळातील शेवटच्या कार्यकर्त्यासह जनते पर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो या आशयाचे पञ विधान परिषद चे आमदार बाबाजानी दुर्राणी तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी यांच्यां वतीने देण्यात आले.
मानवत नगर परिषदेचे माजी नगर सेवक तथा एक निष्ठ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अब्दुल हबीब बागवान (भडके) यांच्यां निवडीचे सर्व स्तरातून स्वागत  होत असुन निवडी बद्दल त्यांना डाॅ. लहूकूमार सोळंके , माजी नगर सेवक नियामत खाॅन ,दत्तरावजी मायंदळे यांच्यासह अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नियुक्तीपत्र विधान परिषद चे आमदार तथा परभणी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते देण्यात आले.
समाज सेवक अब्दुल हबिब बागवान ( भडके ) यांना मानवत शहराध्यक्ष पदाची जबाबदारी भेटल्याने मानवत शहरासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाला बळ मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704