https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीली: मीच माझा

मीच माझा
**************************
वाचून स्वतःला कधीतरी बघा
आयुष्य तुमचे मनसोक्त जगा

वेळ येताच सावलीही सोडते साथ
विझू देऊ नका आत्मविश्वासाची वात

स्वतःच आपण आपले साथी
मर्यादित असतात इतर नाती

न मागता सल्ला देणं व्यर्थ
द्वेष, मत्सर, मोहमाया आणि स्वार्थ

छोटं आयुष्य जायचं नाही खचून
चालत राहायचं दु:खाचं सरण रचून

मारो कोणी कितीही बढाई
आपली आपल्यालाच लढावी लागते लढाई

स्वतःच व्हा स्वतःचे मित्र
नजरेस पडेल सकारात्मक चित्र
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704