ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “माझी प्रेयसी”:लैलेशा भुरे

        माझी प्रेयसी
**************************
प्रेमात तुझ्या सखे
मी आसक्त होत गेलो
झालीस देवता तू
मी भक्त होत गेलो

मी होतो गंधहीन
आयुष्य जगताना
तुला मिठीत घेता
प्राजक्त होत गेलो

दोष नशीबाला
कायम देत राहिलो
घाव सोसताना दुनियेचे
मी सक्त होत गेलो

भेटीविना तुझ्या गं
अतृप्त मी राहिलो
तू भेटलीस जेव्हा
मी आरक्त होत गेलो

तू बोललीस मनीचे
मी ऐकत राहिलो
संकोचलो जरासा
अव्यक्त होत गेलो

 

 

कित्येक पर्याय होते
माझ्या समोर तेव्हा
माणूस चांगलासा
मी फक्त होत गेलो
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.