ताज्या बातम्या

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी गोपाळराव लाड यांची निवड.

मानवत // प्रतिनिधी.
मानवत येथील साप्ताहिक मानवत टाईम्सचे संपादक तथा शोध पत्रकारितेत हातखंड असलेले निर्भीड पत्रकार गोपाळराव लाड यांची दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब यांनी निवड केली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे नव निर्वाचित प्रदेशाध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष दशरथ रोडे , मराठवाडा अध्यक्ष विजय वावळे यांची या वेळी उपस्थिती होती. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा सहावा वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या सर्वच कानाकोपऱ्यातून पुरोगामी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवत टाईम्सचे संपादक गोपाळराव लाड यांनी यापूर्वी परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून तीन वर्ष कार्य केले होते. मागील वर्षी राज्याचे संघटक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आसल्याने तसेच त्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात पुरोगामी पत्रकार संघटन मजबूत झाले.
संघात त्यांची एक वेगळी छाप निर्माण झाली. संघाच्या उत्तरोत्तर प्रगतीच्या दृष्टीचा विचार करूनच संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी सूर्यवंशी यांनी व संघातील सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने गोपाळराव लाड यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या नावाची घोषणा कार्यक्रमातच अधिकृत घोषणा करण्यात आली त्यामुळे उपस्थितीत पत्रकारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी सर्वानी टाळ्यांच्या गजरात लाड यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल मानवत तालुका पत्रकार संघ या सह मानवत टाइम्सचे मित्र परिवार, सामाजिक, राजकीय,व्यापारी क्षेत्रातून त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button