“मी सुभाष” यात्रेचे एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात जंगी स्वागत

नांदेड प्रतिनिधी):भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुपर हिरो नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन चरित्र, कार्य , उद्देश हे सामान्य नागरिकांना पासून ते आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य व संचालनालयाच्या व नेताजी सुभाष इंडिया ट्रस्टच्या पुढाकाराने “मी सुभाष” या यात्रेचा आरंभ करण्यात आला आहे ही यात्रा संपूर्ण भारतभर जाणार असून या यात्रेच्या माध्यमातून नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेले अतुलनीय कार्य आजच्या तरुण पिढीला ज्ञात व्हावे या हेतू रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी जे योगदान दिले ते कधीही न विसरणारे आहे ही यात्रा 14 डिसेंबर रोजी एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथे आली होती या यात्रेच्या स्वागतासाठी महाविद्यालयाच्या डायरेक्टर डॉ. गीता लाटकर उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी आणि हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते