https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आर्य वैश्य महिला सेवाभावी संस्था व शिवराज सेवा भावी संस्थेचा अकरा हजार वृक्ष लावगड करण्याचा संकल्प*

मानवत // प्रतिनिधी

येथील शिवराज सेवाभावी संस्था व आर्य वैश्य महिला सेवाभावी संस्था व शिवराज सेवा भावी संस्थेच्या संयूक्त विद्यमाने यांच्या वतीने वृक्ष लागवड व संगोपन मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी दिनांक १ सप्टेबर रोजी करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष विद्यालयात घेण्यात आलेल्या वृक्ष लागवड या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय अधिकारी शैलेशजी लाहोटी तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवत पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपक दंतूलवार , अप्पर तहसीलदार कोळेकर , मानवत नगर पालिकेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती, कोमल सावरे ,नेताजी सुभाष महाविद्यालयाचे प्राचार्य , नंदकुमारजी सिसोदिया , उपमुख्याध्यापक उद्धव हरकळ , कमलताई सिसोदिया , डॉ शरयूताई खेकाळे , पत्रकार डॉ सचिनजी चिद्रवार , विलासराव बारहाते , आर्य वैश्य महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सविताताई कत्रुवार , सोपानराव अवचार , दत्तराव अवचार आदींची या वेळी प्रमूख उपस्थिती होती.
याप्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७५ वर्षानिमित्त ११ हजार वृक्षांची लागवड करून संगोपन करण्याचा संकल्प शिवराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश आप्पा चिंचोलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
त्यांच्या या उपक्रमाला साथ देत आर्य वैश्य महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने २०० वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा निर्धार करून ५० ट्री गार्ड या वेळी भेट देण्यात आले .
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाष विद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून वृक्षाला राखी बांधून औक्षण करण्यात आले.
तसेच उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना या वेळी खाऊचे वाटप करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरीताई कत्रुवार यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार नेताजी सुभाष विद्यालयाचे श्री सदाशिव होगे यांनी मानले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704