शिक्षणाधीकारी (प्रा) यांचा आमरण उपोषण उठविण्यासाठी देण्यात आलेल्या धमकीवजा पत्राच्या अनुषंगाने अॅड.संघरत्न गायकवाड यांनी कार्यवाही करणेसाठी पो.स्टे.वजिराबाद यांना दिली तक्रार

नांदेड.
अ.भा.महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जि.नांदेड तर्फे अॅड.संघरत्न गायकवाड यांनी जि.प.प्रा.शाळा नविन कौठा नांदेड येथील शाळेतील बोगस कारभार नागराज बनसोडे गटशिक्षणाधीकारी यांच्या उघडकीस आणुन दिल्यानंतर त्यांनी चौकशी समीती नेमुन चौकशी अहवाल हस्तगत केला त्यानंतर अहवालामध्ये संबंधीत शाळेचे सहशिक्षीका राठोड जयश्री मलखनसींग यांनी विद्यार्थ्या अभावी अतिरीक्त ठरु नये यासाठी एकाच दिवशी दि.30/09/2022 रोजी तीसरीसाठी -आठ विद्यार्थी चौथीसाठी -सहा आणी पाचवीसाठी – असे एकुण तेविस बोगस टि.सी. आणुन मु.अ.आनंदा मुसांडे यांना हाताशी धरुन बोगस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
त्यानंतर संबंधीत वर्गशिक्षक / जि.प.प्रा.शाळा जवाहरनगर तुप्पा या शाळेतील सहशिक्षक उत्तम कांबळे यांच्या पत्नी करुणा सोपानराव सोनकांबळे , सहशिक्षक ज्ञानेश्वर जगन्नाथ हराळे , बालाजी बड्डु, बालाजी आडेपवार,सहशिक्षीका भाग्यश्री जाधवयांनी संगणमत करून संबंधित विद्यार्थ्यांची हजेरी लावून त्यांना गणवेश वाटप शालेय पोषण आहार देऊन त्यांचे घटक चाचणी परीक्षा प्रथम सत्र परिक्षा द्वितीय सत्र परीक्षा रेकॉर्ड वर दाखवून त्यांचा निकाल लावून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळवून दिलासंबंधीत शैक्षणीक व आर्थीक भ्रष्टाचार चौकशी समीतीचे अधिकारी पांडे एस.ए.अधिक्षक पं.स.नांदेड यांनी गटशिक्षणाधीकारी नागराज बनसोडे, शा.पो.आ.अधिक्षक गंजेवार, शिक्षणाधीकारी प्रा. सविता बिरगे यांच्याकडे दोषी मुख्याध्यापक व सहशिक्षक यांना सेवेतुन निलंबीत करुन त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी योग्य वाटते अशा टिपणीसह अहवाल दाखल केला.
संबंधीत अधिकारी यांनी दिवाळीचे औचीत्त साधुन संबंधीत दोषी लोकांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी, निलंबन, विभागीय चौकशी न करता केवळ तात्पुरत्या स्वरुपात काही शिक्षकांवर एका वर्षाची वेतन वाढ बंद करुन दिवाळी साजरी करण्यात आली.
येत्या काळात होलीका दहन आहे याचे औचीत्त साधुन अॅड. संघरत्न गायकवाड यांनी संबंधीत दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन बडतर्ड व त्यांना पाठीशी घालणार्या अधीकारी यांचेवर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करणेसाठी दि.29/11/2022 पासुन आमरण उपोषणास बसले असता शिक्षणाधीकारी सविता बिरगे यांनी जि.प.येथील तीन कर्मचारी पाठवुन अॅड.संघरत्न गायकवाड यांना आमरण उपोषण उठविण्यासाठी धमकीवजा पत्र दिले त्यात असे लिहले आहे की, ” सबब आपण केलेले उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे याउपरही आपण आपले उपोषण स्थगित न केल्यास होणाऱ्या पुढील परिणामास आपण जबाबदार राहाल याची दखल घ्यावी” या अर्जाची दखल घेवुन गायकवाड यांनी शिक्षणाधीकारी यांचे विरोधात दि. 05/12/2022 रोजी पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन वजीराबाद नांदेड यांना जिवेमारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार देवुन जो पर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत संवीधानीक मार्गाने माझे उपोषण सुरु राहील असे कळवुन थंडीची , आणी जीवाची पर्वा न करता आज रोजी उपोषणाचा आठवा दिवस पुर्ण करुन यापुढेही चालु राहील माझ्या जीवीतास काही धोका झाल्यास संबंधीत मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधीकारी सविता बिरगे व जिल्हापरिषद प्रशासन,आणी जि.प.प्रा.शाळा नविन कौठा प्रशासन राहील असे कळवीले.