एच.ए.आर.सी. संस्थे तर्फे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालययात एड्स जनजागृती विषयक कार्यशाळा व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गुण गौरव

मानवत / प्रतिनिधी.
जागतिक एड्स जनजागृती सप्ताह निमित्त होमियोपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थे तर्फे संपूर्ण जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयच्या एकूण ०७ तालुक्यातील १४ निवासी वसतिगृहातील ०८ ते १२ वर्षे वयोगटातील मुलीं साठी दि ०१ व ०२ डिसेंबर रोजी एड्स जनजागृती विषयावर ‘पोस्टर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत २९३ विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद देत सहभाग घेतला पोस्टर व चित्र रेखाटून एड्स जन जागृती विषयक विविध विषयांवर संदेश दिला.
विद्यार्थिनी व विदयार्थ्यां मध्ये एड्स विषयी जनजागृती व्हावी म्हणून आयोजित सत्रात डॉ. पवन चांडक यांनी मार्गदर्शन केले. एच.आय.व्ही. ग्रस्तांना समानतेची व भेदभाव विरहित वागणूक देण्याचे आवाहन सोबत एच.आय.व्ही. एड्स प्रसाराची कारणे, समज गैरसमज तसेच, निदान व प्रतिबंध व उपचार विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मानवत तालुका स्तरावरील स्पर्धेतील विजेत्या कु. संस्कृती सोमेश्वर बोडखे प्रथम तर, कु. ऋतुजा परमेश्वर अवचार द्वितीय, कु. स्नेहा शिवाजी अवचार हिने तृतीय क्रमांक मिळवलेल्या विदयार्थीनीचे व स्पर्धेतील सर्व सहभागी विदयार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. सुषमाताई पांचाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मैथिली जोशी यांनी केले. एच. ए. आर. सी. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, राजेश्वर वासलवार, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा मुख्याध्या पिका सौ. मैथिली जोशी व ग्रहप्रमुख अंजली पुरी व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ग्रहप्रमुख सपना राऊत, मंजुषा देशमुख, सुनीता वाकळे, स्मिता पाटील, कविता कुरंगळ, सुनीता नाईक यांच्या सह शिक्षक व विद्यार्थी यांची या वेळी मोठया संख्येने उपस्थिती होती.
**