ताज्या घडामोडी

मानवत येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत अध्यापन प्रक्रियेत पालकांचा सहभाग

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील जिल्हा केंद्रीय प्राथमिक शाळेत अध्यापन प्रक्रियेत पालकांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवला. जेव्हां पालकच वर्गात प्रत्यक्ष वर्ग अध्यापन करतात ती शाळा म्हणजे जि. के. प्रा. शा. मानवत. या शाळेतील शिक्षकांची मराठा सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक झाली असता वर्ग अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा शाळेतील पालक बंधू आणि भगिनींना आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत चक्क वर्ग अध्यापनासाठी पालक वर्ग सरसावला यावेळी अध्यापनाचे कार्य श्रीमती. मंगलताई नितीन बारहाते, श्रीमती लताताई कपिल कच्छवे, श्रीमती. जयाताई देविदास चिंचकर, हिना जफरखान पठाण तसेच एकनाथराव पांचाळ या पालकांनी वर्ग अध्यापन केले. त्यांनी कोणती ही अपेक्षा न ठेवता तेव्हांच शाळा नावा रूपाला येत असतात जेंव्हा पालक शाळेसाठी वेळ देतात अशा सहकार्याच्या वृत्ती मुळेच जि. प. के. प्रा. शा. मानवत आज विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने जिल्ह्यात जिल्हा परिषदेची प्रथम क्रमांकाची शाळा बनली आहे ज्या शाळेत पालक व शिक्षक संबंध दृढ असतात त्या शाळेची गुणवत्ता कोणी ही रोखू शकत नाही असे मत यावेळी अध्यापन प्रक्रिये दरम्यान उपस्थिती पालकांनी व्यक्त केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.