बर्हिजी स्मारक विद्यालय वसमत येथे झालेल्या तालुका स्तरीय खो खो सामन्यात गोरखनाथ विद्यालय चोंडी ( अंबा ) मुलींच्या संघानी दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा वर्चस्व राखत विजय मिळवला.

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलुकर)
o1 डिसेंबर 2022 रोजी बर्हिजी स्मारक विद्यालय वसमत येथे झालेल्या तालुका स्तरीय खो खो सामन्यात गोरखनाथ विद्यालय चोंडी ( अंबा ) च्या 17 वर्षीय व 14 वर्षीय मुलींच्या संघानी दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा वर्चस्व राखत विजय मिळवला.
यात गोरखनाथ विद्यालयाच्या 17 वर्षीय संघाने आहिल्यादेवी होळकर विद्यालय सिरळीच्या संघाचा एक डाव व 11 गुणांनी पराभव केला. तर द वर्षीय संघाने सेमी फायनलमध्ये अनुभवी बहिजी विद्यालय गिरगावच्या संघाचा एक डाव व 12 गुणांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला व बर्हिजी विद्यालय वापटी संघाचा एक डाव व 20 गुणानी पराभव करीत दोन्ही संघ जिल्हास्तरीय खो खो स स्पर्धेस पात्र झाले आहेत… दोन्ही संघांना बर्हिजी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. प्रविण दादा शेळके , संस्थेचे CEO खिल्लारे सर, बर्हिजी विद्यालय वसमत चे उपमुख्याध्यापक श्री. प्रकाशदादा इंगळे सर यांनी विजयी संघाला शुभेच्छा दिल्या… प्रसंगी क्रिडा शिक्षक श्री. मंगेश वायचाळ सर, डि.एस. कदम सर, वाडीकर सर, क्रीडा मार्गदर्शक कदम ए . एस . सर, शेखर पतंगे सर उपस्थित होते…