ताज्या घडामोडी

मानवत येथे १०१ जणांचे रक्तदान , ६० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेरविच्या कार्यक्रमात मंत्री परिवाराचा आदर्श स्तुत्य उपक्रम

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील स्व श्रीमती गंगाबाई मोहनलाल मंत्री यांचे स्मरणार्थ रविवारी ता २३ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण १०१ जणांनी रक्तदान केले . तसेच नेत्ररोग शिबिरात आलेल्या ६० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली . तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे .
येथील रचना कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदलालजी मंत्री यांच्या मातोश्री गंगाबाई मंत्री यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या तेरविला धार्मिक विधि सोबतच रक्तदान शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मंत्री परिवाराच्या वतीने रविवारी ता २३ शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालयात घेण्यात आले .
उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीर व जिल्हा अंधत्व निवारण समिती लातूरच्या टीमने १५० नेत्र रुग्णांची तपासणी केली . ६० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले . या ६०पैकी ३२ रुग्णांवर सोमवारी ता २४ उदगीर येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या . उर्वरित २८ रुग्ण मंगळवारी ता २५ शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले .
या सर्व शस्त्रक्रियेचा पूर्ण खर्च मंत्री परिवार च्या वतीने केला आहे .
इंडियन रेडक्रॉस सोसायटी उदगीर द्वारा संचलित नागप्पा आंबरखाने रक्तपेढी च्या रक्तदान शिबिरात १०१ नागरिकांनी सहभाग नोंदवला .


शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ विजयकुमार तोष्णीवाल,सुरेश तिवारी , ईश्वरप्रसाद बाहेती ,डॉ जगदीश भरडीया , योगेश तोष्णीवाल, जगदीश लाहोटी , सुदर्शन मंत्री , गोपाळ मंत्री , पंकज लाहोटी , रुपेश काबरा , सचिन बिर्ला, रामानंद मंत्री यांनी प्रयत्न केले .

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.