धारूर महाविद्यालयाची प्रबोधन एड्स जनजागरण रॅली संपन्न

धारूर – 1 डिसेंबर 2022
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एनसीसी कॅडेट्स व शासकीय ग्रामीण रुग्णालय धारूर यांच्या वतीने दिनांक 01 डिसेंबर *रोजी एड्स दिन* निमित्ताने धारूर शहरामध्ये प्रबोधन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयामध्ये प्रथमतः विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एन. सी.सी. कॅन्डेट्स, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांना एड्स दिनानिमित्त उपप्राचार्य मेजर डॉ. एम. एन. गायकवाड यांनी उपस्थितांना एड्स जनजागृती शपथ दिली. त्यानंतर महाविद्यालयातून रॅलीला मा. प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली. कसबा, नगरपरिषद, काशिनाथ चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे रॅली महाविद्यालयात येऊन विसर्जित झाली. यावेळी विद्यार्थी, स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स यांनी रॅलीतून घोषणा देत जनजागृती केली. यावेळी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील जाधव, समुपदेशक श्री. स्वामी प्रेमानंद, श्री. अमोल राऊत (एक्स-रे टेक्निशियन) तसेच महाविद्यालयातील एनसीसीचे मेजर डॉ. उपप्राचार्य एम. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, कार्यक्रमाधिकारी डॉ.डी. एन गंजेवार, डॉ. रामेश्वर भोसल कार्यक्रमाधिकारी डॉ गोविंद बावस्कर यांनी रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.एन.गंजेवार कार्यक्रमाधिकारी रामेश्वर भोसले
प्रा. डॉ. अशोक लाखे, डॉ. एल. बी. जाधवर, डॉ. भारत पगारे, डॉ. दत्ता जाधव, डॉ. बसवले मॅडम, डॉ. अनंता गाडे, ग्रंथपाल प्रा. गोपाल सगर, डॉ. नितीन कुंभार, प्रा. उकंडे सर, प्रा. टी. एन. ढवळे, प्रा. जगदीश शिंदे, प्रा. विराज देशमुख, प्रा. भोसले, प्रा. राम लोखंडे, प्रा. वैरागे, प्रा. ढेपे यांनी सहकार्य केले. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स याबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.