https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

विज उपकरणाचा शॉक लागून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील घटनेमूळे गावावर शोक कळा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. मांडेवडगाव येथे एका शिक्षकास विजेचा उपकरणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील रहिवाशी असेलेले शिक्षक संदीप ज्ञानोबा शेळके वय (३३) वर्षे हे आपल्या घरी दिवाळी सणाच्या सुट्टी निमित्त गावाकडे दिपावली साजरी करण्यासाठी आले असता २१ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेचा सुमारास घरातील विद्युत उपकरणाचा शॉक लागला घटनेची माहिती कुटूंबीयातील व्यक्तीना समजताच त्यांनी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी उत्तरिय तपासणी केली असता मृत घोषित केले व शवविच्छेदन करण्यात आले शेळके यांच्या आकस्मिक मृत्यू मुळे मांडेवडगाव व शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
शेळके यांनी स्वामी समर्थ गुरुकुलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी जिद्दिने व तळमळीने कार्य केले आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, काका, काकू, भाऊ, असा मोठा परिवार असून शेळके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर शिक्षण क्षेत्रातून हळ हळ व्यक्त केल्या जात आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704