ताज्या बातम्या

मानवत ग्रामीण रुग्णालयाचे काम समाधान कारक – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मानवत // प्रतिनिधी.

मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी भेट देऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला यावेळी मानवत ग्रामीण रुग्णालयाच्या कामात आपण समाधानी असल्याचे मत त्यांनी या वेळी आढावा बैठकीत व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की,
दिनांक 22 जुलै रोजी परभणी जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेट देण्या बाबत दौरा जाहीर केला होता.
त्याप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम सोनपेठ ग्रामीण रुग्णालय , पाथरी ग्रामीण रुग्णालय व मानवत ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेट दिली मानवत ग्रामीण रुग्णालयात आल्या नंतर त्यांनी सर्वप्रथम कोविड काळा मध्ये आलेला ऑक्सिजनचा पी.एस.ए. प्लांट व त्या साठी आलेल्या जनरेटर हे कार्यान्वित आहे कि नाही याची पाहणी केली त्या नंतर जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी विभाग निहाय पाहणी केली.


या वेळी रक्त संकलन केंद्रची स्थिती, बाह्य रुग्ण विभाग, क्ष कीरण विभाग, प्रयोग शाळा, प्रसूतिगृह, शास्त्रक्रिया गृह,प्रसूती कक्ष, पुरुष कक्ष , स्त्री कक्ष या विभागातील कामाची पाहणी करूण त्या संबंधीचा आढावा घेतला या वेळी त्यांनी गरज असेल त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केले.
त्या नंतर कोविड साठी आलेल्या केंद्र सरकार च्या वीस बेड रुग्णालयाच्या कामाचे त्यांनी पाहणी केली. त्यानंतर नुकतेच महाराष्ट्र शासनाने मानवत ग्रामीण रुग्णालया चे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात केले आहे.
या वेळी उपजिल्हा रूग्णालयाच्या ईमारतीच्या नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यां सोबत आढावा बैठक घेतली या वेळी आढावा बैठकीत त्यांनी केलेल्या पहाणीतील 3 रुग्णालय पैकी मानवत ग्रामीण रुग्णालयाचे काम समाधानकारक असून अत्यंत जीर्ण असलेल्या इमारतीमध्ये देखील येथील कर्मचारी रुग्णसेवा देताना कुठेही कमी पडत नाहीत याचेही त्यांनी कौतुक केले.


यावेळी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप , जिल्हा बाह्य रुग्ण अधिकारी डॉ. कल्याण कदम , डॉ. किशोर सुरवसे , उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , नुकत्याच रुजू झालेल्या मानवत तहसिलच्या तहसीलदार प्रतीक्षा भुते, तत्कालीन तहसीलदार सारंग चव्हाण , तालुका आरोग्य अधिकारी डॉ रेहान शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ महेश शिंदे, डॉ. निर्णय बाकळे यांच्या सोबत जिल्हा रुग्णलायचे जिल्हा औषध निर्माण अधिकारी गणेश कराड, माधव जाधव, अभियंता अंजुम, घुबे , लक्ष्मण पारीख, बिडवे , रुग्णालयाच्या इन्चार्ज शुभांगी जोशी , औषध निर्माण अधिकारी शीतल गायकवाड, क्ष किरण अधिकारी स्वाती तांबडे ,डॉ शितल नाईकवाडे, सकुल कुलकर्णी समुपदेशक राजु काच्छवे, बालिका सुरवसे , अश्विनी वानखेडे, मंजुषा खनके , हेमंत कदम,संजय मानवतकर , नरेश टोणपे ,डॉ शेख नेत्र चिकित्सा अधिकारी,कपिल भरड , करुणा ढेपे , रत्नमाला दाभाडे, सारिका आखाडे, रेणुका देशमुख, विठ्ठल धोपटे ,राजू पिंपळे, बजरंग दादा ढवळे, मोहन कांगडा, दीपक कुमावत आदी या वेळी उपस्थित होते.
चौकट हृदय शास्त्रक्रिया झालेल्या बालकांचा सत्कार यावेळी मानवत ग्रामीण रुग्णालय मधील राष्ट्रीय बाल स्वास्थ अंतर्गत कार्यक्रमात सहा (६ ) वर्षाच्या स्वरा नरवडे रा. करंजी व दीपाली हारके केकरजवळा या दोन बालका वर ह्रदय शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात आल्या या दोन्ही बालकांचा पुष्प गुच्छ देऊन जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ अधिकारी डॉ सुषमा भदर्गे डॉ गजदत्त चव्हाण, डॉ.ललित कोकरे, डॉ प्रीती दीक्षित, फार्मासिस्ट सचिन कदम, सुनील खरात, अधीपरि सेविका दीक्षा गायकवाड यांच्यासह शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचे नाते वाईक या वेळी उपस्थित होते.

****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button