ताज्या बातम्या

सिनेट निवडणूक 2022 काही अनुत्तरीत प्रश्न. डॉ. बालाजी चिरडे..

नांदेड :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका आता सुरू झालेले आहेत त्यांचा प्रचारही शिगेला पोहोचलेला आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी केंद्री विद्यापीठ व्हावे याच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी करणे शक्य होते पण ते करण्यात आले नाहीत त्यामुळे नव्याने या विषयाकडे विचार केला पाहिजे असे मत डॉ. बालाजी शिर्डी यांनी व्यक्त केले आहे
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा विभाग काय करतो?
1. खरे तर उपस्थित विद्यार्थी अनुपस्थित कसे येतात हा चिकित्सेचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासली जाते व उपस्थिती अहवाल विद्यापीठाकडे असतो तरीही अनेक विद्यार्थी अनुपस्थित कसे काय येतात? परीक्षा विभाग नेमके काय करतो?
2. उपस्थिती अहवालाची मूळ प्रत विद्यापीठाकडे असते तरीही विद्यापीठ विद्यार्थ्यांना महाविद्यालय व परीक्षा केंद्र यांच्या चकरा कशासाठी मारायला लावतात?
3. एकाही परीक्षाकेंद्राच्या प्रमुखाने विद्यापीठाशी हितसंबंध जोपासण्यासाठी या विषयावर प्रश्न उपस्थित केला नाही.
विद्यार्थी केंद्री विद्यापीठासाठी प्रयत्न…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका आता सुरू झालेले आहेत त्यांचा प्रचारही शिगेला पोहोचलेला आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी केंद्री विद्यापीठ व्हावे याच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी करणे शक्य होते पण ते करण्यात आले नाहीत त्यामुळे नव्याने या विषयाकडे विचार केला पाहिजे

निकाल लागल्याबरोबर परीक्षा दिलेल्या मुलांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थिती येते त्यानंतर विद्यार्थी विद्यापीठामध्ये जातो आपण कल्पना करा की किनवट पासून निलंगा पर्यंत तीनशे किलोमीटरचे अंतर आहे या अंतरातील आणि परिघातील प्रत्येक कॉलेजचे किमान 50 विद्यार्थी म्हणजे किमान 5000 ते 10,000 विद्यार्थी विद्यापीठांमध्ये येतात प्रत्येक विद्यार्थी जर पाचशे रुपये खर्च करत असेल तर ते एकूण किती रुपये होतात याचाही आपण विचार करावा विद्यार्थी विद्यापीठांमध्ये येतात त्यांना कुठे जायचं कुणाला भेटायचं काहीही माहिती नसते अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठातील परीक्षा विभागातील लोक मुलांना त्या त्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रामधून तुम्ही उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र घेऊन यायला सांगतात मुलगा रिकाम्या हाती आपल्या कॉलेजमध्ये येतो आणि प्राचार्यांकडे किंवा परीक्षा केंद्रप्रमुखाकडे आपल्या उपस्थितीचे प्रमाणपत्र मागतो

केंद्रप्रमुखांनी उपस्थितीचे मूळ पत्र किंवा कागद विद्यापीठाला पाठवलेले असते परंतु विद्यापीठ ते पाहत नाही त्याची शहानिशा करत नाही आणि उलट पत्र ते प्राध्यापकांना प्राचार्यांना देतात पण एकही प्राचार्य विद्यापीठाला अशी विचारणा करत नाहीत की आम्ही तुम्हाला उपस्थिती उपस्थितीचे मूळ पत्रक तुम्हाला दिलेले असताना तुम्ही परत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर का पाठवता या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांची पंधरा-वीस दिवस जातात पैशाचा खर्च होतो मानसिक त्रास होतो अनेकदा एमए च्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तारखा निघून जातात त्याचे भयंकर शैक्षणिक नुकसान होतं ही साधी गोष्ट दुरुस्त व्हायला फार वेळ लागत नाही परंतु ही समस्या आहे हे सुद्धा सिनेटच्या सदस्यांना वाटत नसेल तरीही अधिक गंभीर गोष्ट आहे याबद्दल सर्व प्राध्यापकांनी प्राचार्यांनी व्यवस्थापकांनी विचार केला पाहिजे

प्रा. डॉ. बालाजी चिरडे
9545093311

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button