ताज्या बातम्या

मानवत येथील ऊस तोड कामगारांचा मुलगा झाला अधिकारी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील हनुमान नगर तांड्या वरील युवक मारोती पवार यांनी महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. गुलाबराव पवार यांचा मुलगा मारोती पवार यांनी महाराष्ट्र लोक सेवा अंतर्गत परीक्षा दिली असता त्यांनी कठोर परिश्रमाणे व जिद्दीने या परीक्षेत घव घावीत यश सांपादन केले.
या वेळी त्यांचा मानवत नागरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मारुती गुलाबराव पवार’ या मानवत तांड्या वरील तरुणाने महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेतील कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अर्थात STI (राज्यकरनिरीक्षक ) पदी विराजमान होण्याचा मान मिळवल्या बद्दल त्यांचा मानवत येथे भव्य सत्कार करण्यात आला. वसुंधरा अभ्यासिका येथील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक किशन भिसे , महाले , ठोंबरे , मा. नगर सेवक एड् ऋषिकेश बारहाते, दत्तराव चौधरी स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी असलेले मारुती पवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मानवत वासीयांना आपल्या कामगिरीचा अभिमान आहे.
या निमित्ताने त्यांची मानवत शहरात घोड्यावर बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मानवत नगर परिषदेचे शिल्पकार डॉ. अंकुशराव लाड यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे युवकांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून परिश्रमाची गरज आहे. स्पर्धा परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. निश्चितच ही कठीण परीक्षा असते मात्र यात गुणवत्ता मिळवल्यास करियर घडते. मानवत सारख्या शहरात UPSC, MPSC, STI यासारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दर्जेदार व सर्व सुविधांनी युक्त अशी अभ्यासिका” आणि आमच्या खेळाडूंसाठी “भव्य असे क्रीडा संकुल” निर्माण करण्याचा माझा अनेक दिवसां पासूनचा मानस आहे.
आज या सत्कार प्रसंगी मी या दोन्ही गोष्टींची पूर्तता करण्याचा संकल्प सर्वां समोर मांडला.
यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येईल अससे मत या वेळी डॉ. अंकुशराव लाड यांनी व्यक्त केले.

***

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button