ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक कै, पंडितराव विश्वनाथराव यादव रामपूरीकर सभागृहात संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे ०९ जानेवारी रोजी
भारतीय जनता पार्टी मानवत मंडळाची महत्वाची बैठक मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या *कै. पंडितराव विश्वनाथराव यादव रामपूरीकर* सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
मानवत कृषि ऊत्पन्न मार्केट कमिटीच्या *कै. पंडीतराव विश्वनाथराव यादव रामपूरीकर सभागृहात* महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्या नंतर बैठकीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विलासजी बाबर यांनी पी. एम. विश्वकर्मा योजना नोंदणी बद्दल माहिती दिली, विकास भारत संकल्प यात्रेत सर्वांनी सहभागी होऊन योजनांचा लाभ सर्वांना देण्यात यावा असे आवाहन केले. तर यावेळी डॉ. सुभाष कदम यांनी मंडळ कार्यकारणीचा आढावा घेतला जिल्हाध्यक्ष मा. संतोष भाऊ मुरकुटे नमो चेषक , नमो ब्रँड अँबेसिडर, अयोध्या दर्शन, परभणी लोकसभा ही भाजपच लढवणार, या विषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष मा. संतोष भाऊ मुरकुटे यांचा सत्कार बाबासाहेब कदम यांनी केला तर डॉ. सुभाष कदम लोकसभा समन्वयक यांचा सत्कार दादासाहेब भोरकडे सरचिटणीस यांनी केला सुभाष अंबड सरचिटणीस यांचा सत्कार भास्करराव बोडके अध्यात्मिक आघाडी यांनी केला विलास बाबर सरचिटणीस याचा सत्कार प्रवीण मगर यांनी केला, शिवाजी मवाळे सरचिटणीस यांचा सत्कार महादेव कोल्हे पाटील युवा मोर्चा अध्यक्ष यांनी केला मंगला मुदगलकर सरचिटणीस यांचा सत्कार माणिक मोगरे उपतालुका अध्यक्ष यांनी केला संतोष चौधरी पंचायत राज समिती यांचा सत्कार आबा कोंढाळ यांनी केला प्रमोद कराड लोकसभा विस्तारक यांचा सत्कार सुभाषराव जाधव यांनी केला प्राचार्य अनंतराव गोलाईत ओबीसी मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांचा सत्कार तालुकाध्यक्ष विकास मगर यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ कुऱ्हाडे यांनी केले तर विश्वकर्मा योजनेचा माणूस शहरात लाभ मिळवून देण्यासाठी मेळावा आयोजन केल्याबद्दल प्राचार्य अनंतराव गोलाईत यांचा सत्कार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष विकास मगर, सुभाष जाधव, संदीप हंचाटे, दादासाहेब भोरकडे, मनोज जगताप, प्रवीण मगर, बाबासाहेब खरात, नागनाथ कुर्‍हाडे, अमोल कुर्‍हाडे, रवी वाघमारे, बाळासाहेब लाडाने, लक्ष्मण लाडाने, बळीराम निर्वळ, कृष्णा जाधव, नंदू कच्छवे, नामदेव हरगुडे, माणिक मोगरे, भास्कर राव बोडके, सुरेश थोरवट, आबासाहेब कोंडाळ, दिगंबर मगर, मारुती पितळे, गणेश शर्मा, रणजीत दहे, उमेश पाटील आदीनी परिश्रम घेतले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.