https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

गडचिरोलीत भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा

गडचिरोली पोलीस दल व मैत्री परीवार संस्था नागपुर यांचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्हा हा शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या अतिशय मागास असल्याने याठिकाणचे आदिवासी बांधव आर्थिकदृष्ट्या सदन नसल्याने गडचिरोली जिल्हयातील आदिवासी उपवर-वधु यांना नवजीवनाची सुरुवात करुन देण्याकरीता तसेच आदिवासी बांधवांची संस्कृती जोपासण्याकरीता गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व मैत्री परीवार संस्था नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने १२७ आदिवासी वर-वधुंचा भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळा” अभिनव लॉन गडचिरोली येथे आज पार पडला. 

गडचिरोली शहरातील महिलांनी ठिकठिकाणी वरातीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.

गडचिरोली पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्यात ०७ आत्मसमर्पीत व दुर्गम व अतिदुर्गम भागातील इतर १२१ असे एकुण १२७ जोडपे सहभागी झाले होते. गडचिरोली पोलीस दलामार्फत विवाह सोहळयाकरीत अभिनव लॉन गडचिरोली येथे सुसज्ज मंडपाची व्यवस्था केली होती. दोन दिवस चाललेल्या या विवाह सोहळयातील सहभागी जोडप्यांना पहिल्या दिवशी गडचिरोली पोलीस दल व मैत्री परीवारातर्फे लग्नाचे साहीत्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये लग्नाचा पोशाख, चप्पल-जोडे, जोडवे, मंगळसुत्र इ. साहीत्य तसेच संसारोपयोगी भेटवस्तु देण्यात आल्या. तसेच दुसऱ्या दिवशी १२७  आदिवासी वर-वधुंचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या सोबतच नव वर-वधु व त्यांना आशिर्वाद देणेसाठी त्यांचेसोबत त्यांचे नातेवाईक असे एकुण २००० ते २५०० च्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित होते.

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर जनजागरण मेळावा, महामेळावा दरम्यान सुध्दा भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळा पार पाडला जातो. सन २०२१ या वर्षात पोस्टे उपपोस्टे व पोमके स्तरावर ६८ आदिवासी जोडप्यांचे विवाह तसेच सन २०२२ साली एकुण ११७ आदिवासी जोडप्यांचे विवाह पार पाडण्यात आले.

माजी नगराध्यक्ष सौ.योगिता प्रमोद पिपरे यांनी वधु-वर यांना आशीर्वाद दिले.

 

या भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळ्यास आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, खासदार. अशोक नेते, मा. अतिरिक्त सचिव भारत सरकार, राजकमल पाठक, माजी अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळ, भारत सरकार सौ. शुभा मिश्रा, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर संदीप पाटील, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी (कारवाफा) मयुर भुजबळ, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव  प्रा. प्रमोद पेंडके, अध्यक्ष (शाखा गडचिरोली) निरंजन पाटील वासेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या भव्य सामुहीक आदिवासी विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, मैत्री परिवार संस्था,नागपूर आणि गडचिरोली यांचे सक्रीय सदस्य यांनी अथक परिश्रम घेवुन या विवाह सोहळ्याकरीता मोलाची कामगिरी पार पाडली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704