https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

*तेलंगना राज्या प्रमाणे महराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रूपये या प्रमाणे पेरणी करिता अनुदान द्यावे

मानवत / प्रतिनिधी.

तेलंगना राज्या प्रमाणे महराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही एकरी दहा हजार रूपये या प्रमाणे दर वर्षी पेरणी करिता अनुदान देण्यात यावे अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाचा वतीने महाराष्टाचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे मानवत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे कारण्यात आली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद कारण्यात आले आहे की, तेलंगना राज्यातील शेतकऱ्यांना शेती पेरणी करिता दरवर्षी प्रति एकरी दहा हजार रुपये प्रमाणे दिले जाते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेती पेरणी करिता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. तर महाराष्ट्रातील शेतकरी हे पेरणी करिता आर्थिक अडचणीत येऊन स्वतःचे व आपल्या कुटूंबाचे जीवन उध्वस्त करून आत्महत्या करतात याचाच आढावा तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेऊन शासनाला अहवाल सादर केला की तेलंगना राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ही शेतकऱ्यांना शेती पेरणी करिता दर वर्षी प्रति एकरी दहा हजार रुपये अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येणार नाहीत हाच अहवाल शासनाने तात्काळ अंमलात आणून तेलंगना राज्या प्रमाणे महराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही एकरी दहा हजार रुपये प्रमाणे दर वर्षी पेरणी करिता अनुदान देण्यात यावे अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाचा वतीने निवेदनाद्वारे केली असून निवेनावर भारत राष्ट्र समिती पक्षाचे पाथरी विधानसभा समन्वयक बालासाहेब आळणे पाटील, प्रा. प्रकाश विटेकर, हनुमान मसलकर, गणेश सुरवसे यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704