https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापन सोहळ्या निमित्त मानवत येथे भव्य शोभा यात्रा

प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या नामाचा जय घोषणाने मानवत नगरी दुमदुमली

मानवत / प्रतिनिधी.

अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने मानवत शहरात ही लोकत्सव समिती चा वतीने २२ जानेवारी रोजी भव्य अशी शोभा यात्रा मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक शहरातील महाराणा प्रताप चौका पासून ते गणपती मार्ग पासून राम मंदिरा पर्यंत या मिरवणु कीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीराम नामाचा जय घोषणा संपूर्ण मानवत नगरी दुमदुली होती दरम्यान मिरवणुकीत विविध सजीव देखावे सादर करण्यात आले होते. यात वीर हनुमान, श्रीराम पथक, शिवकालीन मर्दाणी खेळ, कलशधारी महिला मंडळ, हालगी पथक, वासुदेव पथक, टाळ मृदूंग व भजनी मंडळ, प्रभू श्रीराम दरबार आदी देखावे या वेळी सादर करण्यात आले होते. या नयन दिप सोहळ्या निमित्त संपूर्ण शहरात अगदी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तर या आनंदोत्स वात शहरातील व्यापारी वर्ग, अबाल वृंध, महिला तसेच रामभक्त हे भगवे लाल वस्त्र आणि रुमाल परिधान करुन मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मानवत पोलीस प्रसासनाचा वतीने ही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704