माहिती तंत्रज्ञान

अविष्कार संशोधन महोत्सवात एमजीएम संचलित कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे घवघवीत यश

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठामार्फत अविष्कार २०२३ या संशोधन महोत्सवाचे आयोजन नांदेड येथे दि.१७ आक्टोबर रोजी करण्यात आले होते. या संशोधन महोत्सवांमध्ये एमजीएम संचलित कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय नांदेड च्या.विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. जैवतंत्रज्ञान विभागातून डॉ.मकरंद चेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली मुगावे या विद्यार्थिनीने “रिलेशनशिप बिटवीन चाईल्ड ट्रॉमा अँड क्रोनिक इलनेस” या प्रकल्पाला पदवी गटातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तसेच गिल पुष्पदीप कौर आणि फुलारी रुपाली यांच्या “बायोप्रॉस्पेसिटिंग” याना पदव्युत्तर
विभागातून द्वितीय पारितोषिक मिळाले. गिरी वैष्णवी व संगमकर अशोक याना “ग्रोविंग ग्रेट गार्डेनिंग युजींग लाइव्हस्टोक” याना पदवी विभागातून द्वितीय पारितोषिक मिळाले या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. कागणे जी. के. यांनी मार्गदर्शन केले . तसेच संगणक विभागातून जाधव ओंकार व गज्जेवार वैभव याना “डिजिटल रेकॉर्ड रूम सिस्टिम ” या प्रकल्पासाठी द्वितीय पारितोषिक मिळाले असून, प्रा. गिल एस. एस. यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले. बीएस्सी प्रथम वर्षातील व्यवहारे वैष्णवी व आरसुळे प्रतीक्षा यांना “स्मार्ट फार्म गार्ड” या प्रकल्पास प्रथम पारितोषिक मिळाले आहे यांना प्रा. गहेरवार ए. एम. यांनी मार्गदर्शन केले.सुयश राहेगावकर व जैस्वाल देवेन यांच्या “लेजर मायक्रोस्कोप” या प्रकल्पास प्रथम पारितोषिक मिळाले आहे, या विद्यार्थ्यांना प्रा शिंदे एस. पी. यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. कमलकिशोर कदम, एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ.कांचन नांदेडकर व विभाग प्रमुख डॉ. मकरंद चेरेकर यांनी अभिनंदन केले तसेच प्रा.अनिता शिंदे, प्रा. स्वाती वडदरे व प्रा.कागणे जी.के. यांनी अविष्कार प्रभारी म्हणून काम पाहिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button