https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

बौध्द समाजा बद्दल अपशब्द काढणाऱ्या दिलीप चेरेकरवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा.

समाज बांधवाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्याचे निवेदन सादर <

मानवत / प्रतिनिधी.

बौध्द समाजा बद्दल अपशब्द काढणाऱ्या दिलीप चेरेकर याच्या वर तात्काळ अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या सह विविध मागण्याचे निवेदन समाज बांधवाच्या वतीने तालुका प्रशासना मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,
लातूर येथील दिलीप चेरेकर जाधव या व्यक्ती इंस्टाग्राम, फेसबुक, असा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ काढत समस्त बौध्द समाजा बद्दल व महिला यांना अत्यन्त नीच पातळीचा स्तरावरून बोलत शिवीगाळ केली असून दोन समाजा मध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे त्यामुळे समस्त बौध्द समाजाचा भावना अत्यन्त दुखावल्या असून सदरील व्यक्तीवर तात्काळ अट्रॉसिटी कायद्या सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दखल करुन त्यास तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सदरील खटला हा फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, आरोपी हा कोणत्या पक्ष संघटनेचा कार्यकर्ता आहे का ? याचा तात्काळ शोध घेऊन या मागचा मुख्यसूत्रधार कोण आहे याचा ही तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच आरोपीने जो आक्षेपार्ह तयार केलेला विडिओ आहे तो न्यायालयामध्ये सबळ पुरावा म्हणून पोलीस प्रशासना ने सादर करावा, सदरील आरोपीचा तपास आणि खटला हा कोणत्याही बौध्द समाजाचा पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा, खटला परभणी जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्यात यावा आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनावर रवि पंडित, दिपक ठेंगे, छगन भदर्गे, आदर्श धबडगे, हर्षदिप काकडे, आनंद साळवे, सूरज खरात यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704