https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली.डॉ सच्चिदानंद शेवडे‌‌

मानवत / प्रतिनिधी

मराठवाडा मुक्ती संग्राम या बद्दल मराठवाड्यातील जनतेमध्ये फारच कमी माहिती आहे.
ज्या मराठवाड्यात आपण जन्माला आलो त्या मराठवाड्याला स्वतंत्र होण्यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला. मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांनी मार्गदर्शन करतांनी व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील साने गुरुजी वाचनालय सभागृहात येथे सांस्कृतिक वार्तापत्र या लढा मराठवाडा मुक्ती संग्राम विशेषकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक वार्तापत्र चे संपादक मिलिंद शेटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजयजी लड्डा यांची उपस्थिती होती. यावेळी डाॅ. सच्चिदानंद शेवडे‌‌ यांच्या हस्ते सांस्कृतिक वार्तापत्राच्या लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मिलिंद शेटे व पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार, के. के. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार,किरण देशमुख, चैतन्य कुलकर्णी अशोक कोटलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी वाचनालयाचे सचिव रेणकोजी दहे यांनी केले तर सूर्यकांत माळवदे यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरजी तुपसागर यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सुनिता झाडगावकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहरातील व्यापारी, नागरिक, शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, महिला, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रेक्षकांना साने गुरुजी वाचनालयातर्फे प्रत्येकांना पुस्तक भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष डॉ.अशोक चिंदुरवार, प्रसाद जोशी, विलास मिटकरी, शैलेशजी काबरा, डॉ.चेतन व्यास,सुनिता झाडगावकर, सुभाष बंडे, आबा कहेकर यांनी परिश्रम घेतले.

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704