स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगरूळ बु. पाटीवर ऊस वाहतूक बंद करूण केले आंदोलन*

मानवत / प्रतिनिधी.
सण २१ -२२ हंगामात गाळपास गेलेल्या ऊसासाठी एफ आर पी अधिक दोनशे रुपये अंतिम भाव मिळावा व राज्य सरकारने त्या साठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आर एस एफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्याना आदेश दयावे आणि ऊस तोड मजूर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे महामंडळा मार्फतच पुरवावे या सह आदी मागण्या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २१ व्या ऊस परिषदे मध्ये निर्णय झाल्या प्रमाणे व ७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्या मध्ये ठरल्या प्रमाणे १७ व १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील दोन दिवशीय लक्षणिक ऊस वाहतूक बंद आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे या आंदोलनात सहभागी होत. पाथरी पोखर्णी या महामार्गावरील मानवत तालुक्यातील मौ. मंगरूळ पाटी येथे मानवत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक बंद आंदोलन करण्यात आले या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरची हवा सोडून देण्यात आली व होणारी ऊस वाहतूक बंद करण्यात आली दरम्यान ऊस वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा मानवत तालुकाध्यक्ष विठ्ठलराव चोखट, दत्तराव परांडे, रवि चोखट, ज्ञानोबा चोखट यांच्या सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
***