ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान संपन्न

————————————–
उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव “मेरी माटी मेरा देश’ हे अभियान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचने नुसार देशपातळीवर “मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये कलश रॅली काढण्यात आली होती. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कलश मध्ये माती भरून भारत माता की जय घोषणा दिली. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पंचप्रणची शपथ ही देण्यात आली.
यावेळी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. धनजय गोंड, परीक्षा नियंत्रक डॉ. शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा.रशिद दायमी, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. संजीवनी भालेराव, प्रा.हनमंत सूर्यवंशी, प्रा. ऋतुजा दिग्रसकर,प्रा. राखी शिंदे, प्रा. असिफ दायमी, प्रा. नावेद मणियार, प्रा. आवेज शेख, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. त्वरिता मिटकरी, उषा गायकवाड,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, अमोल मसुरे, प्रशांत पाटील, सुमित शेलाळे, हर्षद बदणाले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयसेवक यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.