https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

गायरान जमिनीवर उभारण्यात येणारा सौर प्रकल्प स्थगित करा

गायरान धारकांची तहसीलदार रणजितसिंग कोळेकर यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. भोसा येथील गायरान जमीन गट सर्व्हे नंबर .२५ मधे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून हा सौर प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अशी मागणी भोसा येथील गायरान धारकांनी मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रणजितसिंग कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील भोसा येथील गायरान धारक सन १९७० पासून जमिनीची वहिती करत असून कुटूंबाचा उदर निर्वाह शेती करून करत आहेत.
परंतु काही महिन्या पूर्वी अशी माहिती प्राप्त झाली कि, येथील गायरान जामीन गट क्रं २५ मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला जानार आहे. परंतु प्रकल्प उभारल्यास उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सदरील हा प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अन्यथा लोकशाही मार्गाने मानवत तहसील कार्यालया पुढे अमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा ही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला असून निवेदनावर गायरानधारक डी.एम. झोडपे, धोंडीराम झोडपे, वामन झोडपे, कोंडीराम झोडपे, उषा वाव्हळे, पद्मावती गायकवाड, नारायण झोडपे, कोंडीबा झोडपे, परमेश्वर प्राधान, भगवान सावळे, प्रकाश प्रधान, कोंडीबा झोडपे, वेणूताई झोडपे, साखरूबाई प्रधान, शांताबाई झोडपे, सुभाष झोडपे, विमल झोडपे, सूर्यकांत ढोले, लक्ष्मण झोडपे, सुंदर झोडपे, भगवान झोडपे, निवृत्ती झोडपे, बाबुराव झोडपे, रामचंद्र झोडपे, लक्ष्मण झोडपे यांच्या सह गायरान धारक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704