https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून ते सोडविणार :तालूकाप्रमूख शेख समीर.

शिवसेना अल्प संख्याक मानवत तालुकाध्यक्ष पदी शेख समीर यांची निवडीबद्दल समाजात हर्षउल्हास.

समीर यांच्या निवडी बद्दल सर्व मित्र परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील सामाजिक कार्यकर्ते शेख समीर शफीयोद्दिन यांची नुकतीच शिवसेना अल्प संख्याक मानवत तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र पाथरी येथील शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय येथे ०८ जानेवारी रोजी शिव सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सईद भैया खान, शिवसेना अल्प संख्याक जिल्हाध्यक्ष लाल खा. असरफा खा. पठाण, शिवसेना अल्प संख्याक प्रदेश सचिव, आसेफ खान, जिल्हा परिषद माजी सभापती दादा साहेब टेंगसे, माजी जिल्हा परिषद सदस्य चक्रधर उगले, शिवसेना अल्प संख्याक प्रदेश उपाध्यक्ष हसीब खान, मा. नगरसेवक शाकेर भाई सिद्दीकी, मा. नगरसेवक युसुफोद्दिन अन्सारी, शिवसेना नेते संजय नाना टाकळकर, अल्पसंख्यक महाराष्ट्र युवक प्रदेशा अध्यक्ष मेहराज खान, मा. नगर सेवक साजिद अली राज, मा.नगर सेवक शेख इरफान, मा. नगरसेवक अनिल पाटील, हबीब खान युवक शहर अध्यक्ष, मा. नगरसेवक सतीश वाकडे, मा. नगर अध्यक्ष हाजी भाई खुरेशी, मा. नगर सेवक हनीफ भाई खुरेशी, मा. नगर अध्यक्ष मोइन अंसारी शिवसेना तालुका अध्यक्ष अल्प संख्याक अहमद आत्तर, फारुख दादा अंसारी, मुबारक चाउस, युनुस खुरेशि, आनंत नेब, माजी नगर सेवक अनिल ढवळे, शकील बेग, आलम अजीज बागवान, समीर मकसूद शेख, यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी निवड झाल्या बद्दल शेख समीर यांनी मान्यवरांचे आभार मानले , या वेळी बोलतांना शेख समीर म्हणाले की, वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करू तसेच अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून ते सोडविणार असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. तर शेख समीर यांच्या निवडीबद्दल मित्र परिवार व मानवत तालूक्यातील समाज बांधव आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यातून निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704