तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन देयके सादर करा अन्यथा पूर्णवेळ प्राध्यापकांना पगार मिळणार नाही

नांदेड:डॉ. प्रवीण कुमार सेलुकर
नांदेड: तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांचे मानधन देयके सादर करावी अन्यथा पूर्ण वेळ प्राध्यापकांचे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान वेतन स्वीकारले जाणार नाही असे पत्र नांदेडचे विभागीय सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यासंदर्भात विविध महाविद्यालयातील प्राचार्यांना परिपत्रकाद्वारे तंबी दिली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड ,हिंगोली, परभणी, लातूर ,या जिल्ह्यात अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावरील
जवळपास हजारो नियुक्त आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना सेवार्थ प्रणाली द्वारे दरमहा वेतन अदा करावे या आदेशाकडे कार्यक्षेत्रातील प्राचार्य शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करीत होते.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना दरमहा मानधन न देता ते केवळ वर्षातून एक किंवा दोन वेळा मानधन मिळत असल्याने कुटुंबाचा खर्च कसा भागवावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मागील अनेक वर्षापासून प्राचार्य तासिका तत्त्वावर प्राध्यापकाचे मानधन विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे दाखल करण्यास मुद्दाम टाळाटाळ करत आहे.
विभागीय सहसंचालक यांनी तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या विविध संघटनांची मानधन मिळण्यासाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेत सी एच बी प्राध्यापकांना वेळेवर मानधन मिळावे यासाठी पूर्णवेळ प्राध्यापकांची वेतने थांबून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन विभागीय कार्यालय सादर केले तरच पूर्णवेळ प्राध्यापकांची नोव्हेंबर महिन्याची अनुदान वेतन काढू असा निर्णय घेतल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.