https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नांदेड, कंधार, माहूर आयटीआयच्या वतीने 2 ऑक्टोबरला गड किल्ल्याच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम

*

नांदेड (जिमाका) दि. 30 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे 2 ऑक्टोंबर रोजी राज्यातील गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

या मोहिमेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, माहूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड, कंधार, माहूर किल्ल्याच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानात संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणविर यांनी दिली.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704