ताज्या घडामोडी

इलियास मणियार यांच्या निधनामूळे सामान्याचे छत्र हरविले

मानवत // प्रतिनिधी.
मानवत शहरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व इलियास आमिर मोहम्मद मन्यार यांचे आज दि.23/11/2023 रोजी सायंकाळी निधन अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
इलियास मनियार हे सदैव आपल्या सामाजिक कार्याला समर्पित होते.
त्यांच्या भाषा शैली मूळे आणि त्यांच्या कार्य कौशल्यामूळे सामाजीक कार्याबरोबर राजकारणाचा मोठा दांडगा संपर्क होता.मनियार यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर एकदा खासदारकी आणि आमदार पदाची निवडणूक लढवली होती.
ते अनेक कौशल्यांचा मालक होता आणि नगर सेवक हबीब भडके यांचे खास बाल मित्रां पैकी एक होता.
मनियार यांच्या निधनांची बातमी ऐकून मित्र परिवारासह , मानवतकरांना धक्काच बसला. यावेळी चांगल्या मित्राची उणीव मनाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया हबीब भडके यांनी या वेळी श्रध्दाजंली च्या माध्यमातून दिली.
इलियास मनियार यांच्यावर येथील दफन भूमित अत्यंस्कार करण्यात आले.
या वेळी मोठा जन समूदाय त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाला होता. आरोग्यमित्र मनियार यांच्या अकस्मीत निधना मूळे सामान्य नागरिकांचे छत्र हरविले त्यांच्या निधनामूळे मानवतकरांवर शोक कळा पसरली.

,

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.