https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

मानवत येथील आई इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची गूळ कारखाण्यास क्षेत्रीय भेट

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील आई इंग्लिश स्कुलच्या शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक ११ डिसेंबर रोजी पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथील लघु उद्योग गुऱ्हाळ कारखान्यास भेट दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच विविध उद्योगाचाही अभ्यास असावा या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ही भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी उसापासून गूळ कसा तयार होतो हे प्रत्येक्ष पाहिले व उसाची गाळप, उसाचा रस, उसाच्या रसाच्या मोठं मोठ्या कढाई, गुळ तयार करायचे वाफे, गुळाची पॅकींग, गुळाचे ट्रान्सपोर्ट ह्या सर्वं विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच या वेळी सर्व मुलांना माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांसह सर्वांनाच गूळ खाण्याचा मोह आवरला नाही गुळ कारखान्याचे संचालक श्री. लालू खाँन यांनी सर्वं विध्यार्थ्यांना कामकाजा विषयाची सविस्तर माहिती दिली. यावेळी आई इंग्लिश स्कुलचे संचालक श्री. मुक्तीराम गोरे, शाळेचा मुख्याध्यापिका अभिलाषा ठाकूर, शिक्षिका सीमा रासवे, अनुसया परांडे, अश्विनी भिसे, अश्विनी कुमावत, वैष्णवी सुरवसे, मनिषा कदम, अनुराधा गोलाईत, वैष्णवी माकुडे, अंजली पंडित, राणी गोलाईत, मोनिका आतकरे, अंकिता कुलकर्णी, शबाना शेख, आसाराम गोरे यांच्यासह आई इंग्लिश स्कुलचे शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704