https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

कै. विठोबाजी लटारे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुका  संघचालक राहिलेले  कैलासवासी विठोबाजी लटारे यांनी  हिंदू विचाराने एका ध्येयाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन जगले. त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून एक आदर्शमय व्यक्तिमत्व समाजापुढे निर्माण केल्याचे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय महामंत्री  योगेशजी बापट यांनी चामोर्शी येथील डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर द्वारा संचालित कै. विठोबाजी लटारे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे लोकार्पण करताना केले.

यावेळी संघाचे प्रांत सहप्रचारक परिक्षीतजी जावळे  चंद्रपूर विभागाचे विभाग संघचालक जयंतरावजी खरवडे, डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष  वसंतरावजी थोटे, गडचिरोली जिल्हा संघचालक  घिसुलालजी काबर ,डॉक्टर मिलिंदजी घरोटे, प्रांताचे सेवा प्रमुख सुनीलजी मेहर, विभाग प्रचारक अश्विनी जयपूरकर यांचेसह  कै. विठोबाजींच्या धर्मपत्नी व मुलगा उपस्थित होते.

संघाच्या सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लटारे परिवारांच्या सौजन्याने सदर  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी विठोबाजींच्या सहवासात आलेल्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत विठोबाजी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विठोबाजी आयुष्यभर हिंदुत्ववादी विचाराशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी  विचाराशी फारकत न घेता आपले कार्य एकाच ध्येयाने  पुढे नेले. त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनामध्ये हिंदुत्वाशी कधी तडजोड केली नाही त्यांचे व्यक्तिमत्व हे समाजासाठी आदर्शमय व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन यावेळी योगेशजी बापट यांनी मार्गदर्शन करताना केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704