ताज्या बातम्या

विज वितरणचा तूघलकी कारभार, झिरो लाईनमनच्या नावावर शेतकर्‍यांची हेळसांड.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मंगरूळ बू येथील गेल्या चार दिवसा पासून तीन रोहित्रास पुरवठा करणारी विद्यूत वाहतूक करणारी तार तुटली असून या संबंधी मूख्य लाईनमन मुलगीर यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून माहीती दिली असता लाईनमन मूलगीर यांनी गावातील झिरो वायरमेन यांना संगतो असे म्हणून शेतकर्‍यांची समजूत घालून रवानगी केली तरी आज चार दिवस झाले तरी याकडे विज वितरण कंपनीचे दूर्लक्ष केल्या जात असल्याने शेतकर्‍यांची हेळसांड होत आहे.
सध्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन पिकाची पेरणी केली असून या परिसरात पाऊस सुध्दा अत्यअल्प प्रमाणात पडला आहे.
सद्या शेतकर्‍यांनी हजारो रुपयाचे बी बियाणे या सह खत शेतकऱ्यांनी काळ्या आईच्या कूशीत पेरले आहे.
सध्दा परिसरात तार तूटल्या मूळे सर्वत्र लाईट बंद असल्या मुळे बी बियाणे वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत.
मंगरूळ बू मध्ये झिरोवायर मेन जवळ पास 10 ते 12 जन असल्याचे बोलल्या जात आहेत.
मंगरूळ बु येथील शेतकऱ्याची मेंटणसच्या नावावर वसूली करून साहेबाला पैसे देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करण्याचे सत्र सूरू असल्याचे बोलल्या जात आहे.
तरी विज वितरणचे वरिष्ठअधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन झिरोवायरमन वर अकूंश ठेवावा.
व अशा लाईनमन कडून जो कर्मचारी काम करून शेतकऱ्याची लूट करतो त्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी त्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे.
विज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करावे लागेल अशी चर्चा शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.
आंदोलन काळात काही अनूचित प्रकार घडल्यास त्यास विज वितरणचे कर्मचारी व अधिकारी जवाबदार राहिल असे शेतकर्‍या मधून बोलत्या जात आहे.

****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button