४१ वर्षांनी नेताजी सूभाष विद्यालयातील वर्गमित्र- मैत्रिणी नी दिला जुन्या आठवणीला उजाळा

मानवत / प्रतिनिधी.
दि.२६ जून रोजी मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी स्नेह, आपुलकी, जिव्हाळा जपत तब्बल ४१ वर्षांनी वर्ग मित्र-मैत्रिणींनी अनुभवाची शिदोरी घेऊन स्नेह मिलन साजरे केले.
येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष विद्यालया तील सन १९८१ वर्षातील १० वी वर्गात शिकणाऱ्या वर्ग मित्र- मैत्रिणी चा दोन दिवसाचा स्नेह मिलन सोहळा शहरातील नेहा मंगल कार्यालयात दि. २५ व २६ जून रोजी संपन्न झाला.
यावेळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष नेताजी सुभाष विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मा. गोपीचंद्रजी सिखवाल सर हे होते.
यावेळी मान्यवर शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण पूजन करण्यात आले.
यावेळी सन १९८१ वर्षीच्या शिक्षकांचा सपत्नीक शाल, श्रीफळ , भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. दिलीप हिबारे यांनी केले. यावेळी मा. गोपीचंद्र सिखवाल सर, मा. उत्तम थोबाळ सर, मा.सुधाकर कुलकर्णी सर , मा. अंकुश मुंढे सर , मा. अंबादास बंडे सर , मा.भराडिया सर. या वेळी वर्ग मित्र बाबूलाल शिंदे, दिलीप गुंडू, पुष्पा कोकाटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
दि.२५ रोजी आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणीला उजाळा देत सर्व वर्ग मित्रांनी शाळेला भेट दिली. या वेळी रत्नाकर पेडगावकर व विशाखा पेडगावकर सुंदर गायन , दिलीप जोशी ,स्वाती जोशी, दिलीप हिबारे,पुष्पा कोकाटे कविता, जयकुमार दगडू यांनी विनोद सादर केले,संजय विटेकर व अश्विनी विटेकर यांनी गजल सादर करून सर्वांचे मने जिंकली.
या वेळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर पेडगावकर, रत्नाकर सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय विटेकर यांनी मानले. या वेळी कार्यक्रमास मानवत, पाथरी, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सिन्नर, परभणी येथून ७० वर्ग मित्र या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी करण्यासाठी दिलीप हिबारे, दत्त प्रसाद बांगड, दिगंबर बाकळे, नंदकुमार घमंडी ,राजु काबरा, रवि कत्रुवार, जयकुमार दगडू, मुंजाभाऊ जाधव, उत्तम मगर, पुष्पा कोकाटे यांनी परिश्रम घेऊन स्नेहमिलन कार्यक्रम यशस्वी केला.
****