क्रीडा महोत्सव २०२५: आजच्या स्पर्धा – कबड्डी (मुले/मुली खेळाडू)
स्थळ : क्रीडा संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

नांदेड:दि ३डिंसेबर
कबड्डी (मुले) या क्रीडा प्रकारात पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सहा आणि दुपारच्या सत्रात सहा असे एकूण बारा सामने पार पडणार आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरुद्ध वारणा विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या त पहिला सामना पार पडणार आहे. दुसरा सामना मुंबई विद्यापीठ, मुंबई विरुद्ध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. तिसरा सामना डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई विरुद्ध महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. चौथा सामना यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विरुद्ध कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. पाचवा सामना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विरुद्ध गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि सहावा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यात होणार आहे.
दुपारच्या सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विरुद्ध कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक. दुसरा सामना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे विरुद्ध डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. तिसरा सामना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर विरुद्ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. चौथा सामना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विरुद्ध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. पाचवा सामना डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई विरुद्ध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि सहावा सामना यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्यात होणार आहे.
कबड्डी (मुली) या क्रीडा प्रकारात पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सहा तर दुपारच्या सत्रात सहा सामने पार पडणार आहेत. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, मुंबई विरुद्ध वारणा विद्यापीठ, वारणानगर यांच्यात पहिला सामना पार पडणार आहे. दुसरा सामना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई विरुद्ध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. तिसरा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर. चौथा सामना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विरुद्ध महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. पाचवा सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरुद्ध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि सहावा सामना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली विरुद्ध गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यात होणार आहे.
दुपारच्या सत्रामध्ये कबड्डी (मुली) या क्रीडा प्रकारात सहा सामने पार पडणार असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्यात पहिला सामना पार पडणार आहे. दुसरा सामना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विरुद्ध महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. तिसरा सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरुद्ध कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक. चौथा सामना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली विरुद्ध यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात होणार आहे. पाचवा सामना मुंबई विद्यापीठ, मुंबई विरुद्ध कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात तर सहावा सामना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई विरुद्ध डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई यांच्यात रंगणार आहे.



