ताज्या घडामोडी

प्रगत कौशल्य आत्मसात करणे आधुनिक काळाची गरज – प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन

स्वारातीम विद्यापीठात आर. टी. पी. सी. आर. वर चार दिवसीय प्रत्यक्षकृती प्रशिक्षण सुरू

नांदेड: (डॉ.सेलुकर प्रवीणकुमार)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जैविकशास्त्र संकुलामध्ये जैविकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी रियल टाईम पी.सी.आर. (आर.टी.-पी.सी.आर.) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील चार दिवसीय प्रत्यक्ष कृती प्रशिक्षण शिबिराला दि.१४ नोव्हेंबर, २०२५ रोजी सुरुवात झाली. हे शिबिर १४ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले असून केंद्र सरकारच्या पी.एम. उषा योजनेच्या आर्थिक साहाय्याने, जैविकशास्त्र संकुल व हायमेडीया लॅबोरेटरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या धोरणाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून
त्याचाच एक भाग म्हणून या प्रगत तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर.टी.पी.सी.आर. तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकीय व संशोधन क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोविड-१९ काळात स्वारातीम विद्यापीठाने मराठवाड्यातील एकमेव एनएबीएल मान्यता प्राप्त प्रयोगशाळेद्वारे जवळपास दोन वर्षे ४ लाख कोविड नमुन्यांची विनामूल्य तपासणी करून समाजकारणाचे मोलाचे काम बजावले, ही बाब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. महाजन म्हणाले की, “आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. ज्ञानसाधना, प्रयोगशीलता आणि संवाद ही प्रगतीची प्रमुख साधने असून आर.टी.पी.सी.आर. सारखे तंत्र आत्मसात केल्याने संशोधन क्षेत्रातील संधी अधिक विस्तारतात.”
या प्रशिक्षणासाठी विषय तज्ज्ञ म्हणून मनोजकुमार बोरसे व डॉ. सुनील कोकणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. लक्ष्मीकांत कांबळे
यांनी केले. उद्घाटन प्रसंगी डॉ. कृष्णचैतन्य (संचालक, केंद्रीय उपकरण सुविधा केंद्र),
डॉ. सुनील हजारे, डॉ. उमेश धुलधज, डॉ. मिलिंद गायकवाड, समरीन पठाण, रुबिया शेख, विद्या सुकरे, डॉ. संजय चव्हाण, प्राजक्ता चांडोळकर, डॉ. सुयश कठाडे, वसुधा कोडगिरे, खाजा मोईनुद्दीन, राजू हसेकर, राजू शेरे, सुशील खरवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.