ताज्या घडामोडी

स्पर्धेतील अपयश म्हणजे यशाची पूर्वतयारी होय – प्राचार्य डॉ.दुर्गेश रवंदे

नांदेड (दि.12) :
स्पर्धेतील अपयश म्हणजे यशाची पूर्वतयारी होय, त्यामुळे खेळाडूंनी निराश न होता यशासाठी पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी आणि यश संपादन करावे, असे प्रतिपादन इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, नांदेड येथील प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिभा निकेतन महाविद्यालयात आयोजित सेंटर झोन आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात प्राचीन काळापासून खेळाची समृद्ध परंपरा असून कबड्डी, खो-खो सारखे खेळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जात असताना दिसतात.

या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक वाघमारे यांनी केले तसेच त्यांनी विद्यापीठाने प्रतिभा निकेतन महाविद्यालयाला तायक्वांदो ही स्पर्धा घेण्याची संधी दिल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आणि क्रीडा मंडळ सदस्यांचे आभार व्यक्त केले.

या उदघाटकीय समारंभाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. पी.नीळकंठराव, ग्रंथपाल डॉ. रविंद्र लाठकर, डॉ.एस.व्ही.शिंदे, डॉ. श्रीमंत राऊत, श्री. बालाजी जोगदंड (सचिव, तायक्वांदो जिल्हा असोसिएशन, नांदेड) डॉ. छाया कोठे (क्रीडा मंडळ सदस्य), संघ व्यवस्थापक डॉ. किरण येरावार, डॉ. निहाल खान, डॉ. चरणजीत सिंह महाजन, डॉ.राहुल सरोदे, डॉ. मीना भुमे (लातूर) तसेच मुलींचे 9 संघ आणि मुलांचे 18 संघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. संजय हापगुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा संचालक डॉ. दीपक वाघमारे यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.