मानवत येथून ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी महाराष्ट्र शिखर पत्रकार अधिवेशनासाठी रवाना

{ mcr -news / manawat }
——————————————
दिनांक १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे व्हाईस ऑफ मीडिया – V.O.M. इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिखर पत्रकार अधिवेशनासाठी मानवत तालुक्यातील पदाधिकारी आज मानवत येथून उत्साहात रवाना झाले. मानवत येथील ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे तालुका अध्यक्ष कचरूलालजी बारहात्ते, विलासरावजी बारहात्ते, भैय्यासाहेब गायकवाड, मुस्तखिम बेलदार, वसंतराव मांडे पाटील, कपिल शिंदे पाटील यांनी या महत्त्वपूर्ण अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रस्थान केले आहे.
सविस्तर वृत्तानुसार, जगभरातील ४ लाख ७० हजार सदस्यसंख्या असलेली आणि देशातील क्रमांक १ पत्रकार संघटना म्हणून ओळखली जाणारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया – V.O.M. इंटरनॅशनल फोरम’ यांच्यावतीने हे अधिवेशन भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केले जात आहे.
प्रत्येक वर्षी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि पदाधिकारी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. यंदाही विविध जिल्ह्यांतील निमंत्रित पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविणार आहेत.
आपली उपस्थिती अधिवेशनास अधिक उजाळा देणारी ठरेल, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तारीख : १५ आणि १६ नोव्हेंबर २०२५ स्थळ : हर्षद लोहार सभागृह, ईस्कॉन पंढरपूर
**



