यशवंत महाविद्यालय रसायनशास्त्र विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने

यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा महाराष्ट्रातील एक नावाजलेला विभाग असून या विभागातर्फे येत्या 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या निमित्ताने रसायनशास्त्र विभागाविषयी माहिती देणारा हा लेख.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित, यशवंत महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक नामांकित महाविद्यालय असुन या महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा महाराष्ट्रातील एक नावाजलेला विभाग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निष्कलंक व्यक्तिमत्व तथा देशाचे माजी गृहमंत्री कै डॉ शंकररावजी चव्हाण यांनी 1963 साली आपले सहकारी कै शामरावजी कदम, प्राचार्य गो रा म्हैसेकर आदींच्या सहकार्याने या महाविद्यालयाची स्थापना केली. “दुरितांचे तिमिर जावो” हे या संस्थेचे ब्रीदवाक्य असून खेड्यापाड्यातील गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय आजही कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे विद्यमान खासदार तथा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अशोकरावजी चव्हाण,संस्थेच्या उपाध्यक्ष मा आ सौ अमिताभाभी चव्हाण, संस्थेचे सचिव माजी मंत्री मा श्री डी पी सावंत, सहसचिव प्राचार्य रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ऍड उदयरावजी निंबाळकर, श्री पांडुरंगरावजी पावडे, युवा उद्योजक तथा कार्यकारिणी सदस्य श्री नरेन्द्रजी चव्हाण तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू व यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान उपक्रमशील प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. नुकताच या महाविद्यालयास पी एम उषा योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून महाविद्यालयात या अंतर्गत अनेक कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले आहेत.
यशवंत महाविद्यालयात 19 विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण व संशोधन सुविधा उपलब्ध आहेत. यशवंत महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य गो रा म्हैसेकर हे स्वतः रसायनशास्त्र विषयाचे निष्णात प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी पदव्युत्तर रसायनशास्त्र विषयाची सुरुवात 1967 साली केली. महाविद्यालय पातळीवरील हे एकमेव अनुदानित पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय होते.त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठात हे महाविद्यालयात होते व तेंव्हा एम एससी रसायनशास्त्र वर्गासाठी 12 एवढी अनुदानित विद्यार्थी संख्या होती. प्राचार्य गो रा म्हैसेकर यांनी डॉ सुरेश पुरी, डॉ गोस्वामी, डॉ यू के जगवानी, डॉ मठइ, डॉ आर व्हि पाच्छापूरकर, डॉ एस एन खोडसकर, डॉ एम एच जगदाळे, डॉ बी के पाटील आदी तज्ञ सहकारी प्राध्यापक सोबत घेऊन या विभागाची सुरूवात केली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दरवर्षी विद्यापीठात सर्वप्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक जवळपास दरवर्षी यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाच असतो. याही वर्षी ती परंपरा कायम आहे.
या विभागातील प्रयोगशाळा सर्व सोयी सुविधायुक्त असुन अतिशय अद्ययावत आहेत. सध्या या विभागात 40 विद्यार्थी एम एससी प्रथम व द्वितीय वर्गात प्रवेश घेऊन ज्ञानार्जन करत आहेत. या विभागात विद्यापीठ अनुदान आयोग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठ मान्यता प्राप्त संशोधन प्रयोगशाळा असून आजपर्यंत या विभागातून 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी पी एचडी ही पदवी प्राप्त झाली असून 250 पेक्षा जास्त विद्यार्थी हे सेट ,नेट, गेट इत्यादी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. या वर्षी सुद्धा पाच विद्यार्थी सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या विभागातील अनेक विद्यार्थी हे अमेरिका,जर्मनी,ऑस्ट्रेलिया, जपान, इटली, ब्राझील या देशात संशोधन कार्य व उच्च शिक्षण घेत असून काही विद्यार्थी बाहेर देशातील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातच या विभागातील विद्यार्थी आपल्या कार्य कर्तत्वाचा ठसा उमटवत आहेत. विभागातील अनेक विद्यार्थी हे राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा, पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई, आयआयटी, मुंबई, आयझर, पुणे आदि देशातील नामांकित अशा राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. तर अनेक विद्यार्थी हे देशातील वेगवेगळ्या नामांकित अशा विद्यापीठ व महाविद्यालयात प्राचार्य, प्रोफेसर, प्राध्यापक अशा वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.
सध्या या विभागात 13 प्राध्यापक हे पूर्ण वेळ कार्यरत असून त्यापैकी पाच प्राध्यापक हे प्रोफेसर आहेत. तर अकरा प्राध्यापक पीएचडी पदवी प्राप्त असून सात प्राध्यापक विद्यापीठ मान्यता प्राप्त संशोधक मार्गदर्शक आहेत. दोन प्राध्यापकांनी आपले पोस्ट डॉक्टरेट रिसर्च पूर्ण केलेले आहे.या विभागातील दोन प्राध्यापकांचे पेटंट प्रसिद्ध झाले असून प्राध्यापकांना डीएसटी, युजीसी इत्यादी वेगवेगळ्या फंडिंग एजन्सी तर्फे मेजर तथा मायनर संशोधन प्रकल्प मंजूर झालेले आहेत. आतापर्यंत या विभागातील 12 संशोधन प्रकल्प हे पूर्ण झालेले आहेत. या विभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जवळपास एक हजार संशोधन पेपर हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्स मधुन आपले प्रसिद्ध केलेले आहेत. या विभागातील प्राध्यापकांचा मेरीलँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, अमेरिका त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आदी ठिकाणच्या संशोधन संस्थेची आंतरशाखीय संशोधन कार्य केलेले आहे.
रसायनशास्त्र विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र अशी एक सी आय सी ( संशोधन साधन साहित्य केंद्र ) सेंटर ची स्थापना केलेली असून यामध्ये यू व्ही व्हिसिबल स्पेक्ट्रो फ्लोरोमीटर, जी सी एम एस,आय आर , एच पी एल सी, ऍटोमिक ऑब्झर्वेशन स्पेक्ट्रो फ्लोरो फोटोमीटर आदी आधुनिक उपकरणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या विभागामध्ये एक माती परीक्षण केंद्र असून आत्तापर्यंत याचा जवळपास 15000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपयोग घेतलेला आहे. सी आय सी केंद्र अंतर्गत दरवर्षी बी एस सी व एम एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी हँड्स ऑन ट्रेनिंग व ऑन जॉब ट्रेनिंग सेंटर च्या कार्यशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात येते. त्याचा विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी फायदा होतो. अशा प्रकारची सुविधा असणारे हे बहुदा मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय आहे. एखाद्या विद्यापीठाच्या विभागाच्या तुलनेने सुद्धा कदाचित जास्त सोयी सुविधायुक्त व चांगला असा या विभागाचा व महाविद्यालयाचा लौकिक आहेत. या विभागातील बऱ्याच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिलेली असून त्यांना विद्यापीठाची मान्यता आहे. रसायनशास्त्र विभागांमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एक स्मार्ट क्लास रूमची निर्मिती केलेली असून या क्लासरूम मध्ये अतिशय अद्यावत असे इंटरॅक्टिव्ह क्लासरूम बोर्डची सुविधा आहे. बहुतांश प्राध्यापक हे सध्याच्या डिजिटल युगातील काळानुरूप अद्यावत अशी ई लर्निंग सुविधा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विभागातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विद्यापीठातील तथा फार्मा कंपनीतील तज्ञ अशा मार्गदर्शकांना गेस्ट लेक्चर चे आयोजन करून विद्यार्थ्यांना सेट,नेट परीक्षा करता तसेच भविष्यातील नोकरी करता मार्गदर्शन सुविधा पुरवण्यात येते. विभागातर्फे कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा झालेली असून या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना विभागातीलच विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीमध्ये नोकरी मिळालेली आहे. या विभागाने आतापर्यंत अनेक विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरीय सेमिनार चर्चासत्रे याचे आयोजन केलेले आहे. विभागातर्फे तत्कालीन विभाग प्रमुख डॉ एस व्हि कुबेरकर, डॉ व्हि एम गुरव, डॉ वाय बी विभुते , डॉ पी ए कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनाने ड्रग डिस्कवरी अँड नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावरील एक अविस्मरणीय अशी आंतरराष्ट्रीय परिषद सुद्धा घेतलेली आहे.
पी एम उषा योजने अंतर्गत दि 4 ऑक्टोबर 2025 रोजी रसायनशास्त्र विभागातर्फे ” एम्पॉवरिंग द फ्युचर थ्रू केमिस्ट्री”या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. हि परिषद शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न होणार आहे.या परिषदेसाठी उद्घाटक तथा बीजभाषक म्हणून थोर शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ के एन गणेश, संस्थापक अध्यक्ष, आयसर, पुणे व तिरुपती हे येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र, राज्य, संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण राज्यमंत्री श्री डी पी सावंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, शिक्षण सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले, प्राचार्य डॉ गणेश चंद्र शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक तज्ञ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये आयआयटी रुपर येथील प्रोफेसर नरिंदर सिंग, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजी नगर येथील प्रोफेसर डॉ बापूराव शिंगटे, पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ एस डी सावंत, हैदराबाद येथील सिनजेन इंटरनॅशनल या कंपनीचे असोसिएट डायरेक्टर डॉ ओमप्रकाश बंडे मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिस्तप्रिय प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ कविता सोनकांबळे, डॉ हरिश्चंद्र पतंगे,रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ एम ए बशीर,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री संदीप पाटील,डॉ एस पी वर्ताळे, डॉ एस बी जुन्ने, डॉ व्ही एन भोसले, डॉ एस बी सिरसाट, डॉ एस व्हि खानसोळे, डॉ के एल केंद्रे, डॉ एम डी अंभोरे, डॉ डी एस कवळे, डॉ ए एस कुंवर, डॉ एन बी चव्हाण, प्रा एस डी राऊत, प्रा एस एस मावसकर, प्रा एस डी पाटील इत्यादी कार्यरत आहेत.
डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड .
मो नंबर 9403067252



