कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे; काळाची गरज – डॉ.बोकारे माधव

नांदेड:( दि.३० जुलै २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बी.सीएस. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत जाधव, प्रमुख पाहुणे डॉ. बोकारे माधव, डॉ.विश्वाधार देशमुख व डॉ.प्रवीण तामसेकर उपस्थित होते.
प्रारंभी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी प्रमुख पाहुणे डॉ.माधव बोकारे व डॉ.विश्वाधार देशमुख यांचे स्वागत केले.
याप्रसंगी डॉ.बोकारे यांनी, संगणक क्षेत्रातील विविध नौकरी व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कोर्सेस तसेच आजचा विद्यार्थी हा संगणकाच्या युगातील सर्वात उंच उडी मारणारा असून त्यास या सर्व गोष्टींचे अतिशय काळजीपूर्वक जाणीव व दखल घेतली पाहिजे. जेणेकरून आय.टी. कंपनीत चांगल्या प्रकारे नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते; कारण आजच्या युगात नुसते संगणकाचे शिक्षण घेऊन किंवा संगणकाविषयी माहिती असून उपयोगी नाही तर आजचे जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जात असून त्याची सुद्धा परिपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे ठरत आहे.
डॉ.विश्वाधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांप्रती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, संवाद कौशल्य असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न कशा पद्धतीने असू शकतो, याची परिपूर्ण मांडणी विविध उदाहरणाने व्याख्यानातून अतिशय मार्मिक स्वरूपात मांडणी केली.
डॉ.श्रीकांत जाधव यांनी विभागातील विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी विभागप्रमुख डॉ. पी.बी.पाठक उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. प्रवीण तामसेकर यांनी केले तर व आभार डॉ.शिंदे एस.एम. यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणिक कल्याणकर, मतीताई,
धनेश राठोर, ओंकार देशमुख यांनी परिश्रम घेतले आणि उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरनर आदींनी सहकार्य केले.



