ताज्या घडामोडी

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे दि.४ ते १२ मार्च दरम्यान आयोजन

*नांदेड:(दि.३ मार्च २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव दि.४ ते १२ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन दि.४ मार्च रोजी योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत येथील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ.कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते आणि संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री. पांडुरंगराव पावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, युवक महोत्सवाचे समन्वयक डॉ.संजय ननवरे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शोधनिबंध सादरीकरणासाठी ‘शाश्वत विकासाची ध्येय’, पोस्टर सादरीकरणासाठी ‘भारतीय प्रजासत्ताकाची अमृत महोत्सवी वाटचाल’, आणि ‘विज्ञान व तंत्रज्ञान, मानव विज्ञान विद्या शाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील आधुनिक प्रवाह’ हे विषय आणि मॉड्युल सादरीकरणासाठी, ‘विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्य विज्ञान विद्या शाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील आधुनिक प्रवाह’ रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व देशभक्तीपर गीते सुगम व शास्त्रीय गीते नृत्य वाद्य संगीत याचे सादरीकरण ठेवण्यात आले आहे.
शोधनिबंध सादरीकरणाचे समन्वयक डॉ.एम.एम. व्ही.बेग असून सदस्य डॉ.अजय मुठे, डॉ.विश्र्वाधार देशमुख, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ. श्रीकांत जाधव, प्रा.भारती सुवर्णकार आणि डॉ.मोहम्मद आमेर आहेत.पोस्टर सादरीकरणाचे समन्वयक डॉ.नीरज पांडे असून सदस्य डॉ.शिवराज बोकडे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ.धनराज भुरे, डॉ. मदन अंभोरे, प्रा. पी.पी.सिसोदिया आणि डॉ.राजरत्न सोनटक्के आहेत. मॉड्युल सादरीकरणाचे समन्वयक डॉ.प्रवीण मिरकुटे असून सदस्य डॉ.वनदेव बोरकर, प्रा.ए.आर.गुरखुडे, प्रा.पी.आर.चिकटे, डॉ.निलेश चव्हाण, प्रा.माधव दुधाटे, डॉ.साईनाथ बिंदगे आणि प्रा.सोनाली वाकोडे आहेत. क्रीडा स्पर्धेचे समन्वयक डॉ. मनोज पैंजणे असून सदस्य डॉ. रामराज गावंडे, डॉ.बालाजी भोसले, डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.कविता केंद्रे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, प्रा.ए.आर.गुरखुडे, डॉ.दीप्ती तोटावार आहेत. गीत संगीत सादरीकरणाचे समन्वयक डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव असून सदस्य डॉ. शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.विश्वाधार देशमुख, प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.सुभाष जुन्ने, आणि डॉ.डी.एस.कवळे आहेत. रांगोळी स्पर्धेच्या समन्वयक डॉ.नीताराणी जयस्वाल असून सदस्य डॉ.मंगल कदम, डॉ.ए.के.गोरे, डॉ.एस.बी.वानखेडे, डॉ. रत्नमाला मस्के, प्रा.पी.पी.सिसोदिया, प्रा.राजश्री जी.भोपाळे आहेत. प्रमुख अतिथी व्यवस्थापन, नियोजन आणि प्रसिद्धी समितीचे समन्वयक डॉ. अजय गव्हाणे असून सदस्य डॉ.संजय जगताप,, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.शिवराज शिरसाठ, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, अधीक्षक गजानन पाटील व कालिदास बिरादार आहेत आणि प्रमाणपत्र व बक्षीस वितरणाचे समन्वयक डॉ.श्रीकांत जाधव असून सदस्य डॉ.प्रवीण तामसेकर, प्रा.नितीन नाईक आणि डॉ.पी.बी.पाठक आहेत.
दि.१२ मार्च रोजी महोत्सवाचा समारोप सोहळा असून याप्रसंगी अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे हे भूषविणार असून प्रमुख अतिथी परळी वैजनाथ येथील सखारामजी नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पवार आहेत.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात सहभाग घेऊन लाभ घ्यावा; असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.