https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक* मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करनवाल

नांदेड:( दि.५ एप्रिल २०२४)
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा निवडणूक:२०२४ करिता नवमतदार जनजागृती अभियान दि.४ एप्रिल २०२४ रोजी यशवंत महाविद्यालयात राबविण्यात आले.
या अभियानाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करनवाल होत्या.
याप्रसंगी विचारमंचावर महाविद्यालयाचे नोडल अधिकारी व उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
सर्व नवमतदार विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मा. मीनल करनवाल यांनी नवमतदारांना निरपेक्ष मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली तसेच भारतीय संविधान, निवडणूक आयोग, मतदान याबद्दल नवमतदारांसोबत चर्चा करून प्रश्न विचारले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी नवमतदारांसोबतच इतर सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.बनसोडे, जिल्हा परिषद शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ बी.एम.कच्छवे, प्रलोभ कुलकर्णी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.जाधव, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.माधव पुयड, प्रसन्ना घोगरे, प्रशांत मुंगल, जगदीश उमरीकर, परशुराम जाधव, डॉ.अजय गव्हाणे आदींची आणि विद्यार्थी विद्यार्थिनी नवमतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704