https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० स्पर्धाचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील सर्व नागरिकांसाठी *मानवत नगर परिषद मानवत* यांच्या कडून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ४.० अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धासाठी नाव नोंदणी १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान करण्याचे नगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या आता पर्यंत झालेल्या एकूण कार्यक्रमात *मानवत नगर पालिकेने* आपल्या कामगिरीने अव्वल क्रमांक कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
त्याच अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ४.० अंतर्गत मानवत शहरातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यां यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा व निबंध स्पर्धा अशा सहा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा तीन गट स्वरूपात घेण्यात येणार असून यामध्ये पहिली ते पाचवी एक गट सहावी ते दहावी दुसरा गट व खुला गट अशा तीन गटामधून या सर्व स्पर्धा घेण्यात येण्यात येणार आहे.
या तिन्ही स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक असे सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र अशा प्रकारचे बक्षिसे देखील ठेवण्यात आल्याचे *मानवत नगर पालिका* प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तर या स्पर्धांचे नियम पुढील प्रमाणे आहे – स्पर्धक मानवत शहरातील रहिवाशी असावा, सदर स्पर्धा तीन गटामध्ये आयोजित केलेली आहे, स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतः चे साहित्य वापरावे व नगर परिषद मार्फत कोणते ही साहित्य पुरवठा केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, स्पर्धकांनी नोंदणीच्या वेळी आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे, निबंधाची शब्द मर्यादा ४०० ते ५०० शब्द असावे, स्पर्धक चित्रकलेसाठी कोणत्याही प्रकारचा वापर करू शकतो. (उदा. कोलाज, टेक्सर, रंगीत चित्र इ.) जे स्पर्धक आपल्या कलाकृती मध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ४.० यांचा समावेश करतील अशा स्पर्धकांना काही गुण जादा दिले जातील यांची नोंद घ्यावी, टाकऊ पासून टिकाऊ व रांगोळी स्पर्धेत सहभागी इच्छुक स्पर्धकांनी नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, पथनाटय ७ मिनिट ते १० मिनिट कालावधीचे असावे व मराठी भाषेतून असावे, विजेते स्पर्धकांचा निकाल मोबाईल वरून कळविण्यात येईल, स्पर्धेमध्ये नगर परिषदेचा निर्णय अंतिम राहील, एक स्पर्धक वरील पैकी किती ही स्पर्धेत भाग घेवू शकतो पण त्या साठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे व विजेते स्पर्धकांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात येईल. असे पालिका प्रशासन यांच्या वतीने कळविले आहे
कलागुणांना वाव मिळावा म्हणूनच स्पर्धांचे आयोजन – कोमल सावरे
नगरपालिका अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माजी वसुंधरा ४.० या सदराखाली सहा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांमधून पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी व खुला गटातील नागरिकांच्या कलागुणांना मिळावा म्हणूनच अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती, कोमल सावरे यांनी सांगितले.

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704