https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राज्य स्तरीय युवक महोत्सवासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा संघ रवाना.

नांदेड:
संयुक्त राष्ट्र संघद्वारा घोषित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा कृषी संचालनालय, महाराष्ट्र राज्य विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान उदगीर येथे संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा संघ आज रवाना झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी विभागीय स्तरावर यश संपादन करून राज्यस्तरीय युवक महोत्सवात पात्र झाले आहेत. या राज्यस्तरीय महोत्सवासाठी वैयक्तीक लोकनृत्य या कलाप्रकरात आदिती केंद्रे, पोस्टर – प्रतीक्षा हळदे, संकल्पना आधारित स्पर्धा या कलाप्रकरात नाट्य व पथनाट्य – मध्ये रूद्र शर्मा, अखिलेश पांचाळ, ओमजय पुयड, प्रभोध कवठेकर, अदिती केंद्रे, यांची निवड झाली आहे. वैयक्तिक लोकनृत्य या कलाप्रकरत अदिती केंद्रेच्या लावणी करीता महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध ढोलकी वादक रविराज भद्रे, प्रसिद्ध हार्मोनियम वादक देवदत्त मेकाले व सुप्रसिद्ध गायिका पौर्णिमा कांबळे यांची साथसंगत लाभणार आहे. या विद्यार्थ्यांना डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संदीप काळे, डॉ. आनंद आष्ठूरकर, प्रा. दत्ता बडूरे, यांचे मार्गदर्शन लाभले. या महोत्सवा करीता महाविद्यालयाच्या संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. किरण वाघमारे व संघ व्यवस्थापिका म्हणून प्रा. अश्विनी खांडेकर आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, सचिव ॲड. सौ. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर, उप-प्राचार्य डॉ. कल्पना कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. अजय संगेवार, माजी उपप्राचार्य प्रा. मुकुंद गिरगावकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ. शशिकांत दरगु, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शालिनी वाकोडकर, डॉ. सागर साकळे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704