https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मतदारांसाठी मानवत येथे ई.व्ही.एम. व व्ही. व्ही. पॅटची जन जागृती मोहीम

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तहसील प्रशासनाच्या निवडणूक विभागाच्या वतीने १३ डिसेंबर रोजी मानवत शहरातील मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट या निवडणूक मतदान यंत्रा विषयी जन जागृती मोहीम राबविण्यात आली. आगामी विधानसभा व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट मशीन बाबत सर्व सामान्य मतदारात जनजागृती व्हावी तसेच विविध शंकेचे निरसन व्हावे या अनुषंगाने मानवत तहसील प्रशासनाच्या निवडणूक विभागाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट मशीनद्वारे मतदानाचे प्रात्याक्षिक मतदारांना करुन दाखवन्यात आले. यावेळी मानवत तहसील निवडणूक विभागाचे बापूसाहेब रासवे, शशिकांत नेवरेकर, बालाजी होंडे यांची उपस्थिती होती. या वेळी या जनजागर मोहिमेत अनेक मतदारांनी सहभागी होऊन ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट या मतदान यंत्र मशीन बाबत मतदान प्रत्याक्षिक पाहणी करून मतदान प्रक्रिया उपस्थित शेकडो मतदारांनी समजावून घेतली.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704