https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

गडचिरोलीत कारगील विजय दिन उत्साहात साजरा

गडचिरोलीत कारगील विजय दिन उत्साहात साजरा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील कारगील चौक येथे 26  जुलै ला कारगील विजय दिन कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने उत्साहात साजरा  करण्यात आला आहे.अनेक सामाजिक राजकीय पक्षांचे नेते यांनी आदरांजली वाहिली आहे.    

स्थानिक कारगील चौक गडचिरोली येथे कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृती निमित्य भव्य  कारगील स्मारक साकारण्यात आले आहे.सदर स्मारकचे काम 95% पूर्ण झाले असून आहे.आहे. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे भारतीय शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी विशाल वाघ,कारगील चौकचे अध्यक्ष उदय धकाते,सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, डॉ. नरेश बिडकर, नरेंद्र चन्नावार,सुनील देशमुख,किशोर सोनटक्के, राजेंद्र साळवे,अभियंता अंकुश भालेराव,प्रफुल आंभोरकर,वासुदेव बट्टे,महेंद्र वाघमारे, आसिफ पठाण,प्रतिष्टीत व्यापारी, गोविंदसारडा, श्री मेहर रूपेश सलामे,राजू पुंडलिकर ,साहिल गोवर्धन,वैभव रामटेके, आकाश कुळमेथे आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती असल्याने स्मारकचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.नगर परिषद गडचिरोलीतर्फे  वैशिष्ठ्यपूर्ण योजना अंतर्गत सदर कारगील  स्मारक साकारण्यात आले.पुढील महिन्यात या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.

गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा, गडचिरोली च्या विद्यार्थी आणी विद्यार्थिनी ने भरपावसात कारगील स्मारक ला भेट देऊन शहीद सैनिकांना आदरांजली देऊन विजयाचा जय घोष केला.

 

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704